Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेलकट-चिकट होतात? 'हे' उपाय ट्राय करा, पुन्हा पुन्हा शाम्पू करण्याची पडणार नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:49 IST

Hair Care Tips : आपण शाम्पू न करताही काही सोप्या टिप्स वापरून केस फ्रेश आणि चमकदार ठेवू शकता. पाहुयात काही सोप्या टिप्स...

Hair Care Tips : लांब केस रोज धुणं हे फारच अवघड काम असतं. त्यात ऑयली हेअर म्हणजे केस तेलकट होण्याची समस्या मोठी डोकेदुखी ठरते. अनेकांना तर शाम्पू केल्याच्या दुसऱ्या दिवशीच केस तेलकट, चिकट होण्याची समस्या होते. त्रास इतक्यावरच थांबत नाही, कारण केस पुन्हा पुन्हा धुतल्यानेही त्यांमध्ये तेलाचं प्रॉडक्शन अधिक वाढतं, तर केस कमी वेळ धुतल्यानेही ते अधिक तेलकट होतात. अशात काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. आपण शाम्पू न करताही काही सोप्या टिप्स वापरून केस फ्रेश आणि चमकदार ठेवू शकता. पाहुयात काही सोप्या टिप्स...

ड्राय शाम्पूचा योग्य वापर

ड्राय शाम्पू ऑयली केसांसाठी सगळ्यात सगळ्यात सोपा उपाय आहे. यात केसांच्या मुळांवर थोडं अंतर ठेवून स्प्रे करा आणि १ ते २ मिनिटांसाठी तसंच ठेवा. नंतर हलक्या हाताने मसाज करा. याने केसांमध्ये एक्स्ट्रा ऑइल शोषून घेतलं जातं आणि केस फ्रेश दिसतात. जर दुसऱ्या दिवशी केस फ्रेश हवे असतील तर ड्राय शाम्पू रात्री लावून झोपूही शकता. 

ऑइल अब्जॉर्बिंग शीट्स किंवा टिशूचा वापर

जर आपण घरापासून बाहेर आहात आणि घाईत आहात, तर फ्रेश हेअर लूकसाठी टिशू पेपर किंवा ब्लॉटिंग शीट्सचा वापर करू शकता. टिशू हलकेच टाळूवर दाबा, याने तेल साफ होतं आणि हेअरस्टाईलही खराब होणार नाहीत.

टॅल्कम पावडर किंवा कॉर्नफ्लोर

पूर्वी महिला टॅल्कम पॉवडर किंवा कॉर्नफ्लोरचा वापर करत होत्या. या दोन्ही गोष्टी ड्राय शाम्पूसारख्या काम करतात. दोनपैकी कोणतीही एक गोष्ट थोड्या प्रमाणात घेऊन केसांच्या मुळात हलक्याने लेवा आणि नंतर केस विंचरा. काळजी घ्या की, पावडर जास्त प्रमाणात घेऊ नका, असं केल्यास केस पांढरे दिसू लागतील. 

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करून टाळूवर हलकं स्प्रे करा. याने टाळूवरील धूळ, माती, तेल कमी होईल. यामुळे डोक्याची त्वचा आणि केस साफ होतील. हे लावून २ ते ३ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर केस विंचरा.

स्लिक बन किंवा पोनीटेल हेअरस्टाईल

जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर स्किक बन किंवा पोनीटेल चांगले पर्याय आहेत. या उपायांनी तेलकट केस लपले जातील आणि आपल्याला एक क्लीन व स्टायलिश लुक मिळेल. हल्ली क्लीन गर्ल लुक ट्रेंडिंग आहे, जो तरूणींमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Oily hair after washing? Try these tips, skip frequent shampooing.

Web Summary : Struggling with oily hair? Skip frequent shampooing with dry shampoo, blotting sheets, or cornstarch. Apple cider vinegar rinses and sleek hairstyles also help maintain fresh, clean hair.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स