बदलत्या वातावरणामुळे आजारपण येते. त्याच बरोबर त्वचाही खराब होऊ लागते. खास म्हणजे चेहरा. (Does your face look dry and dull? Apply these 4 homemade masks)प्रदूषण, ऊन, हवा, पाणी सगळ्याचा परिणाम प्रथम चेहर्यावरच होतो. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कोणतेही भलते-सलते उपाय करायला जाऊ नका. हे चार फेसमास्क वापरून बघा. (Does your face look dry and dull? Apply these 4 homemade masks)घरीच तयार करता येतात. चेहरा सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात.
१. एक चमचा चंदन पावडर घ्या. त्यामध्ये कडूनिंबाच्या वाळलेल्या पानांचा भुगा घाला. कोरफडीचा अर्क घाला. (Does your face look dry and dull? Apply these 4 homemade masks)सगळं छान मिक्स करा. थोडावेळ गार करत ठेवा. नंतर चेहऱ्याला लावा. सुकेपर्यंत ठेवा मग धूवा. चेहऱ्यावरील डाग यामुळे निघून जातात. तसेच तोंडावर उठलेल्या पुळ्याही जातात. चेहरा छान स्वच्छ होतो. तेलकट त्वचा असेल तर पिंपल्स जाता जात नाहीत. तेही निघून जातील.
२. एका वाटीत २ ते ४ चमचे दही घ्या. ताज छान असं दही वापरा. त्यामध्ये थोडी हळद घाला. नंतर कोरफडीचा अर्क घाला. त्याचं छान मिश्रण करून घ्या. ते गार करत ठेवा. नंतर चेहऱ्याला लावा. सुकले की धूवा. बरेचदा त्वचा कोरडी पडते. या मास्कचा वापर करुन कोरडी त्वचा सुधारता येते.
३. एका वाटीमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये ३ चमचे ओट्स घाला. थोडे दही घाला सगळं छान कालवून घ्या. तयार मिश्रणाचा वापर करून चेहरा स्क्रब करा. चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये आडकलेली सगळी घाण निघून जाईल. आठवड्यातून एकदा तरी हा स्क्रब वापरा. कोमट पाण्याने चेहरा धूवा. म्हणजे कॉफीचा वासही राहणार नाही.
४. चेहरा जर काळवंडला असेल त्यासाठी हा मास्क मस्त आहे. फार काही करावे लागत नाही. एका वाटीमध्ये ३ चमचे बेसन घ्या. त्यामध्ये हळद घाला. थोडं दही घाला. गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब घाला. मध घाला. सगळं मस्त मिक्स करा. आता ते चेहऱ्याला लावा १५ ते २० मिनिटे ठेवा मग धूवा. चेहऱ्यावरील टॅन निघून जाईल.