Join us

ऐन तारुण्यात चेहरा म्हातारा दिसतो? लिंबू पाण्यात ३ गोष्टी मिसळून प्या, त्वचेवर येईल काचेसारखा ग्लो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 12:49 IST

How to reverse dull skin: Anti-aging drink at home: Skin glow tips at home: आपल्याला त्वचा सुंदर, मऊ आणि चकाकती हवी असेल तर खास ड्रिंक प्या, ज्यामुळे त्वचेचा ग्लो वाढेल.

वय वाढलं तरी आपली आजी आणि आई आजही तितक्याच तरुण दिसतात.(Skin care tips) पण याउलट मात्र आपल्याबाबत घडत असते. कमी वयातच आपला चेहरा निस्तेज, म्हातारा किंवा सुरकुत्या आल्यासारख्या वाटू लागतात. जेमतेम २० व्या वर्षी ३० व्या वर्षीचे वाटू लागतो. अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही.(How to reverse dull skin)आपल्यापैकी अनेकांना चेहरा गोरा, सुंदर आणि चमकदार हवा असतो.(Anti-aging drink at home) सुंदर त्वचा केवळ आपले सौंदर्यच सांगत नाही तर आपल्या आरोग्याविषयी देखील अनेक गोष्टी सांगते. चुकीचा आहार, खराब जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषणांमुळे आपल्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.(skin glow tips at home)यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. असं दिसू लागलं की आपला चेहरा वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू शकता. यावेळी आपण महागड्या उत्पादनांचा वापर करतो. जर आपल्याला त्वचा सुंदर, मऊ आणि चकाकती हवी असेल तर खास ड्रिंक प्या, ज्यामुळे त्वचेचा ग्लो वाढेल.( Lemon water for glowing skin)

क्रिती सनॉन कशी दिसते इतकी सुंदर? तिनेच सांगितल्या ७ गोष्टी, चेहऱ्यावरचं तेज कायम वाढतं

आपल्याला वयस्कर दिसायचे नसेल आणि त्वचा निरोगी, चमकदार ठेवायची असेल तर एक खास ड्रिंक रोज आपण प्यायला हवे. पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा म्हणतात. सकाळी रोज हे ड्रिंक प्यायल्याने आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्व मिळेल, ज्यामुळे आपली त्वचा ग्लो होईल. 

हे पाणी बनवण्यासाठी आपल्याला मनुका, केशर, चिया सीड्स आणि लिंबू वापरा. याच्या मदतीने आपण खास ड्रिंक बनवू शकतो. हे ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला एका ग्लासात चमचाभर चिया सीड्स, १० ते १२ मनुके, ५ ते ६ केशर काड्या, पाणी आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. हे पाणी आपल्याला रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे लागेल. ज्यामुळे त्वचा आतून सुधारण्यास मदत होईल. तसेच आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. 

यात वापरले जाणारे पदार्थ आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. चिया सीड्स जळजळ कमी करण्यास, त्वचेचे हायड्रेशन कमी करण्यास आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करतात. मनुका अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.  व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला लिंबू त्वचेला चमक देण्यास आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी