महिलांच्या शरीरात वयोमानानुसार अनेक बदल होतात. गर्भधारणा, वजन कमी-जास्त होणं, हार्मोनल बदल किंवा तणाव यामुळे स्ट्रेच मार्क्स येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.(how to use coconut oil for skin care) यामुळे बरेचदा आपण आपला आत्मविश्वास देखील गमावतो.(coconut oil skin benefits) त्वचेवरील पांढऱ्या किंवा गुलाबी रेषा दिसायला जरी छोट्या असल्या तरी मनावर त्यांचा परिणाम मोठा प्रमाणात होतो.(stretch marks home remedies) स्ट्रेच मार्क्स हे सामान्य जरी असले तरी त्वचा अचानक ताणली जाते किंवा आकुंचन पावते.(coconut oil for glowing skin) गर्भधारणेदरम्यान, वजन वाढल्यानंतर या समस्या साधारणपणे उद्भवतात.(natural remedy for stretch marks) त्वचेच्या आतील थरांमध्ये किरकोळ भेगा पडतात, ज्यानंतर स्ट्रेच मार्क्स म्हणून दिसतात. अनेकांना यामुळे लाज देखील वाटते.(how to use coconut oil for skin care) स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी अनेकजण नारळाच्या तेलाचा वापर करतात. असं म्हटलं जातं की नियमितपणे नारळाच्या तेलाचा वापर केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत होते. पण हे खरं आहे का? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ जुश्या भाटिया सरीन यांनी म्हटलं की, नारळाचे तेल केसांसाठी जितकं फायदेशीर आहे तितकंच फायदेशीर ते आपल्या त्वचेसाठी आहे. पण स्ट्रेच मार्क्स नारळाच्या तेलाने पूर्णपणे नाहीसे होत नाही. ज्या वेळी आपली त्वचा पूर्णपणे हायड्रेट होते, तेव्हा स्ट्रेच मार्क्स कमी होतात. याचा अर्थ असा की, त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे जास्त गरजेचे आहे. नारळाचे तेल त्वचेला जास्त ओलावा देत नाही. उलट ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करते.
डॉक्टर म्हणतात की, खोबऱ्याचे तेल लावले तर आपल्याला फारसा फरक जाणवणार नाही. पण खोबऱ्याचे तेल लावले आणि त्यावर चांगले मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावले तर त्याचा परिणाम अधिक चांगला होईल. यामुळे आपली त्वचा जास्त वेळ हायड्रेट होईल आणि स्ट्रेच मार्क्स हलके होतील. तसेच स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. नियमितपणे मॉइश्चरायझर लावा आणि निरोगी आहार देखील घ्या.
Web Summary : Coconut oil alone won't eliminate stretch marks. Dermatologist Juishya Bhatia Sarin recommends combining it with moisturizer. Hydration is key; coconut oil helps retain moisture, but doesn't deeply hydrate. Maintain a healthy diet for better results.
Web Summary : नारियल का तेल अकेले स्ट्रेच मार्क्स को नहीं हटाता। त्वचा विशेषज्ञ जुइश्या भाटिया सरिन इसे मॉइस्चराइजर के साथ इस्तेमाल करने की सलाह देती हैं। हाइड्रेशन महत्वपूर्ण है; नारियल का तेल नमी बनाए रखने में मदद करता है, लेकिन गहराई से हाइड्रेट नहीं करता। बेहतर परिणाम के लिए स्वस्थ आहार लें।