White Hair Natural Remedy: केस पांढरे होणं ही आजकाल एक मोठी समस्या झाली आहे. अलिकडे कमी वयातही लहान मुला-मुलींचे केस पांढरे होऊ लागले आहेत. त्यामुळे हे पांढरे झालेले केस लपवण्यासाठी महागड्या डायचा वापर केला जातोय. जे केसांचं अधिक नुकसान करतात. अशात आज आपण पांढरे झालेले केस काळे करण्याचा एक उपाय नॅचरल उपाय पाहणार आहोत. जो फेमस आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितला आहे. त्यांनी याबाबत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पांढरे केस काळे कसे कराल?
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी डॉक्टरांनी इंडिगोच्या पानांची पावडर वापरण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, इंडिगोच्या झाडाबाबत आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये खूप काही लिहिलं गेलं आहे. यानं केसांना रंग मिळतो, सोबतच केस मजबूत होतात आणि चमकदारही होतात. हे झाड निळेबंड किंवा ब्लू म्यूटिनी म्हणून प्रसिद्ध आहे. नीळ ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव इंडिगोफेरा अॅरेक्टा असे आहे
इंडिगोचं महत्व?
डॉक्टर सांगतात की, इंडिगो 100 टक्के नॅचरल आणि केमिकल-फ्री आहे. यात अमोनिया, सल्फेट किंवा पॅराबेन नसतं. इंडिगोनं केस मजबूत होतात आणि नॅचरली चमकदार होतात. याचा वापर केल्यावर हेअर कलर 4 ते 6 आठवडे टिकून राहतो. तसेच डोक्याची त्वचाही हेल्दी राहते, कोंड्यांची समस्या दूर होते.
कसा कराल वापर?
हा उपाय करण्यासाठी आधी केस एका माइल्ड शाम्पूनं धुवून घ्या. एखाद्या काचेच्या किंवा चीनी मातीच्या वाटीमध्ये इंडिगो पावडर टाका आणि पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. हातांमध्ये ग्लव्स घाला. तयार झालेली पेस्ट केसांना सगळीकडे व्यवस्थित लावा. शॉवर कॅप घालून पेस्ट 30 मिनिटं ते 1 तास केसांना तशीच ठेवा. नंतर केस पाण्यानं चांगले धुवा, त्यानंतर शाम्पू करा.
डॉक्टर सांगतात की, कलर जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी नॅचरल ऑइल जसे की, खोबऱ्याचं तेल किंवा जोजोबा ऑइलने आठवड्यातून 1 ते 2 वेळा डोक्याची मालिश करा. सोबतच केस धुण्यासाठी नेहमी माइल्ड शाम्पूचा वापर करा.