Lokmat Sakhi >Beauty > फक्त २ आठवडे केसांवर लावा कांद्याचा रस, मग बघा कमाल; केस होतील काळे, गळणेही थांबतील

फक्त २ आठवडे केसांवर लावा कांद्याचा रस, मग बघा कमाल; केस होतील काळे, गळणेही थांबतील

Onion Juice on Hair: केसांसाठी प्रभावी असा एक उपाय म्हणजे कांद्याचा रस. अनेक एक्सपर्ट हा उपाय करण्याचा सल्ला देतात. पण खरंच हा उपाय प्रभाव ठरतो का? तेच पाहुयात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:53 IST2025-07-31T10:52:15+5:302025-07-31T10:53:21+5:30

Onion Juice on Hair: केसांसाठी प्रभावी असा एक उपाय म्हणजे कांद्याचा रस. अनेक एक्सपर्ट हा उपाय करण्याचा सल्ला देतात. पण खरंच हा उपाय प्रभाव ठरतो का? तेच पाहुयात.

Doctor tells amazing benefits of applying onion juice to your hair for 4 weeks | फक्त २ आठवडे केसांवर लावा कांद्याचा रस, मग बघा कमाल; केस होतील काळे, गळणेही थांबतील

फक्त २ आठवडे केसांवर लावा कांद्याचा रस, मग बघा कमाल; केस होतील काळे, गळणेही थांबतील

Onion Juice on Hair: हॉस्पिटल्स कोणतेही असोत सगळीकडे समस्या घेऊन उभ्या असलेल्या लोकांच्या रांगाच रांगा बघायला मिळतात. हार्ट, किडनी, लिव्हर या हॉस्पिटल्ससोबतच स्किन आणि हेअर स्पेशालिस्टकडेही मोठी गर्दी बघायला मिळते. कारण गेल्या काही वर्षात अनेकजण त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांनी हैराण आहेत. त्यात केसगळती किंवा केस पांढरे होण्याची समस्या तर खूप जास्त वाढली आहे. अशात यासाठी लोक महागड्या ट्रिटमेंटही घेतात. इतकंच नाही तर महागड्या प्रॉडक्ट्सचा वापरही करतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, काही घरगुती नॅचरल उपाय सुद्धा केसगळती थांबवली जाऊ शकते आणि केस काळे करता येऊ शकतात. केसांसाठी प्रभावी असा एक उपाय म्हणजे कांद्याचा रस. अनेक एक्सपर्ट हा उपाय करण्याचा सल्ला देतात. पण खरंच हा उपाय प्रभाव ठरतो का? तेच पाहुयात.

प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते सांगतात की, कांद्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे. जो केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करू शकतो. आता विचार करा की, भारतातील एक्सपर्ट्स तर हे नॅचरल उपाय करण्याचा सल्ला देतातच, पण अमेरिकेसारख्या देशातील डॉक्टरही या उपायाला प्रभावी मानतात. म्हणजे नक्कीच काहीतर फायदा मिळत असेल असं आपण समजू.

काय मिळतात फायदे

पांढरे केस होतील काळे

डॉक्टर बर्ग सांगतात की, कांद्यात एक कॅटालेज नावाचं एंझाइम असतं. जे केसांमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइडला तोडतं. हेच हायड्रोजन पॅरॉक्साइड केस हळूहळू पांढरे करतं. अशात कांद्याचा वापरानं ही प्रक्रिया स्लो होते. ज्यामुळे केस पांढरे होणं थांबतं.

लांब आणि दाट केस

कांद्यामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असतं. तसेच केसांमधील केराटिन नावाचं प्रोटीन सल्फरपासून बनलेलं असतं. अशात जेव्हा कांद्याचा रस केसांना लावला जातो, तेव्हा केसांच्या मुळांना पोषण मिळतं. केस मजबूत आणि दाट होतात. तसेच केसांची वाढही चांगली होते.

फंगल इन्फेक्शन आणि कोंडा होईल दूर

डॉक्टर म्हणाले की, कांद्याच्या रसामध्ये अ‍ॅंटी-मायक्रोबिअल गुण भरपूर असतात. अशात यानं डोक्याच्या त्वचेमध्ये फंगल किंवा यीस्ट इन्फेक्शन होत नाही. ज्यामुळे कोंडा होण्याचा धोकाही टळतो.

डॉक्टरांनुसार, 2002 मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्च हवाला देत सांगितलं की, या रिसर्चमध्ये अ‍ॅलोपेसिया ही केसगळतीची समस्या असलेल्या काही लोकांचा समावेश करण्यात आला होता. यांना 2 आठवडे केसांना कांद्याचा रस लावण्याचं सांगण्यात आलं होतं. तेव्हा असं आढळून आलं की, 73 टक्के लोकांच्या डोक्यावर नवीन केस आले होते. यातून हे स्पष्ट होतं की, कांद्याच्या रसानं टक्कल कमी करण्यासही मदत मिळू शकते. तसेच केसगळती रोखण्यासही मदत मिळू शकते.

कसा लावा कांद्याचा रस?

कांद्याचा रस केसांवर लावण्यासाठी 1 ते 2 कांदे बारीक करा आणि त्यांचा रस काढा. हा रस केसांच्या मुळात लावा. 30 ते 45 मिनिटांनंतर हलक्या शाम्पू केस धुवून घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय ट्राय करू शकता. फक्त एकदा उपाय करून फायदा मिळणार नाही.

Web Title: Doctor tells amazing benefits of applying onion juice to your hair for 4 weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.