Hair Fall Cause : आजची बदलती लाइफस्टाईल आणि डाएटमुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. यात केसगळतीची समस्या तर जगभरात होत आहे. केसगळतीची कारणं वेगवेगळी असतात. पावसाच्या दिवसांमध्ये केस थोडे जास्त गळतात. अशात महिला आणि पुरूषांना टक्कल पडण्याचाही धोका असतो. आपणही केसगळतीमुळे चिंतेत असाल तर हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
रात्रीची एक चूक केसगळतीचं कारण...
जास्तीत जास्त महिला रात्री केसांना तेल लावतात आणि रात्रभर तसंच ठेवतात. केसांना तेल लावणं फायदेशीर असतं. पण रात्रभर तेल लावून ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं. डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर सुगन्या नायडू यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कसं लावावं तेल?
डॉक्टरांनी आपल्या व्हिडिओत सांगितलं की, अनेकदा महिला केस मजबूत करण्यासाठी रात्रभर केसांना तेल लावून ठेवतात. त्यांना वाटतं की, असं केल्यानं केसगळतीची समस्या दूर होऊ शकते. पण मुळात असं काही नाहीये.
रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्यानं एकतर उशीचं कव्हर खराब होतं. ते जर वेळोवेळो धुतलं नाही तर चेहऱ्यावर पिंपल्सही येऊ शकतात. त्यामुळे केसांना तेल कधीही केस धुण्याच्या ४५ मिनिटांआधी लावलं पाहिजे.
रोज केस धुण्याची चूक
अनेक लोक केस आणि डोक्याची त्वचा साफ ठेवण्यासाठी रोज केस धुतात. डॉक्टरांनुसार रोज किंवा आठवड्यातून किमान चार वेळा शाम्पू केल्यानं त्वचेतील नॅचरल ऑइल निघून जातं.
तसेच अनेकांना असं वाटतं की, ज्या शाम्पूमधून जास्त फेस येतो. ते शाम्पू केसांसाठी चांगले असतात. पण यावर डॉक्टर सांगतात की, शाम्पूमध्ये जेवढा जास्त फेस तयार होतो, तेवढं केसांचं नुकसान होतं. कारण या फेस येणाऱ्या शाम्पूमध्ये अनेक केमिकल्स असतात. तेच जेव्हा नेहमीच केमिकल्सचा वापर केसांवर केला जातो, केस ड्राय होतात.
काय कराल उपाय?
रोज जर केस धुवायचे असतील तर केवळ पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा जेंटल शाम्पूचा वापर करा आणि केसांसाठी कंडीशनरचा देखील वापर करा. केसांवर केमिकल्स किंवा हीट स्टायलिंगचा वापर करू नका. सोबतच हेल्दी डाएट आणि भरपूर पाणी पिणंही महत्वाचं ठरतं.