White Hair : केस पांढरे होण्याची समस्या ही काही आता केवळ वृद्धांना होणारी समस्या राहिलेली नाही. आजकाल कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. पोषणाची कमतरता, चुकीची लाइफस्टाईल, केमिकल्सचा वापर अशा आणि इतरही काही कारणांनी केस पांढरे होतात. अशात बरेचजण डाय किंवा शाम्पू कलर्सचा वापर करतात. ज्यामुळे दोन आठवड्यांसाठी केस काळे किंवा वेगळ्या रंगाचे दिसतात. पण त्यानंतर पुन्हा केस पांढरे दिसू लागतात. अशात नेहमीच ही समस्या होत असेल एक ठोस उपाय करून केस नेहमीसाठी काळे करणं कधीही फायदेशीर ठरेल.
जर तुम्हीही पांढऱ्या झालेल्या केसांमुळे चिंतेत असाल तर डॉक्टर निशांत गुप्ता यांनी सांगितलेला उपाय करू शकता. या उपायानं केस काळे, हेल्दी आणि चमकदार होतील. अशात हा उपाय काय आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या बिया लागणार हे जाणून घेऊ.
२१ दिवसांचा उपाय
डॉ. निशांत यांनी सांगितलं की, '२१ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले असतील, केस गळत असतील किंवा तुम्हाला थायरॉइड असेल, यूरिक अॅसिड असेल तर हा उपाय २१ दिवस करून बघा. २१ दिवसात तुम्हाला तुमची समस्या दूर झाल्याचं दिसेल'.
काय काय लागेल?
तीळ ५० ग्रॅम
मेथी दाणे - ५० ग्रॅम
अळशीच्या बिया ५० ग्रॅम
सूर्यफुलाच्या बिया ५० ग्रॅम
कलौंजी ५० ग्रॅम
आवळा पावडर ५० ग्रॅम
कसं कराल तयार?
सगळ्यात आधी आवळा पावडर सोडून बाकी सगळ्यात गोष्टी खोबऱ्यासोबत पॅनवर हलक्या भाजून घ्या. त्यानंतर त्या मिक्सरमध्ये टाकून बारीक करा आणि पावडर बनवा.
आता तयार झालेल्या मिश्रणात आवळा पावडर टाकून चांगलं मिक्स करा.
एक ग्लास कोमट पाण्यात हे एक चमचा पावडर टाकून पिऊ शकता.
या पावडरचं पाणी तुम्हाला दिवसातून दोनदा २१ दिवस प्यायचं आहे. तुम्हाला फरक दिसून येईल.
केसांना कलौंजीचे फायदे
या उपाय केस काळे करण्यासाठी कलौंजीचा वापरही करण्यात आला आहे. कलौंजीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट ओमेगा-३ आणि इतर पोषक तत्व असतात. केसांची वाढ करण्यासाठी आणि केसगळती रोखण्यासाठी, पांढरे केस काळे करण्यासाठी कलौंजी फायदेशीर आहे.