Fake Eyelashes Side Effects : सामान्यपणे सगळ्याच महिलांना मेकअप करायला आवडतं किंवा काही महिलांना त्यांच्या कामानिमित्ताने रोज ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागतो. चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी आजकाल बाजारात कितीतरी गोष्टी मिळतात. अलिकडे डोळ्यांवर नकली पापण्या लावण्याचा ट्रेण्ड चांगलाच वाढला आहे. यानं डोळ्यांचं सौंदर्य तर खुलतं, पण दृष्टी जाण्याचा धोका असतो. असा दावा आम्ही नाही तर हार्वर्ड ट्रेन्ड डॉक्टर सौरभ सेठी यांनी केला आहे. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
बऱ्याच तरूणी किंवा महिला डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी फेक आयलॅशेसचा वापर करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. अनेकदा नकळत अशा गोष्टींचा वापर केला जातो, ज्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. फेक आयलॅशेस लावणं त्यापैकीच एक आहे.
डॉक्टर सेठी सांगतात की, जर तुम्ही फेक आयलॅशेस लावत असाल तर यानं अॅलर्जिक रिअॅक्शन, थिनिंगची समस्या होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या नॅचरल लॅशेसही गमावू शकता.
फेक आयलॅशेसपासून सावधान
डॉक्टर सौरभ सेठी यांनी अशा महिलांना इशारा दिला आहे ज्या फेक आयलॅशेसचा वापर करतात. ते म्हणाले की, फेक आयलॅशेस वेगानं लोकप्रिय होत आहेत. पण हे लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लू मुळे अनेक समस्या होऊ शकतात.
डोळ्यांचं होतं नुकसान
डॉक्टरांनुसार, फेक आयलॅशेस लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लूमध्ये अनेकदा फॉर्मेल्डिहायड (Formaldehyde) जे अॅलर्जिक रिअॅक्शन, आणि नॅचरल आयलॅशेस गमावण्याचं कारण ठरू शकतं.
दृष्टीही जाऊ शकते
केवळ इतकं नाही तर डॉक्टर सांगतात की, फेक आयलॅशेसमुळे तुमची दृष्टी सुद्धा जाऊ शकते. याचा धोका कमी असतो, पण काही केसेसमध्ये असं होऊ शकतं.
कसा कराल बचाव
जर तुम्हाला या समस्या टाळायच्या असतील तर फेक आयलॅशेस लावणं टाळायला हवं. त्याऐवजी तुम्ही नॅचरल पापण्यांवर मसकारानं इनहेन्स करू शकता.
फॉर्मल्डिहायड फ्री ग्लू
जर तुम्हाला फेक आयलॅशेस लावणं पसंत असेल तर मग ते लावण्यासाठी फॉर्मल्डिहाइड फ्री ग्लू चा वापर करा.