केस गळणं (Hair Fall) ही समस्या आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उद्भवते. केस विंचरताना फरशीवर केसंच केस पडतात. केर काढताना झाडूत केस असतात, कंगव्यात केसच केस दिसतात अशी अवस्था केस गळती सुरू झाल्यावर होते (Hair Care Tips). रोज एका व्यक्तीचे कमीत कमी १५ ते २० केस गळतात. हेअर फॉल टाळण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (Doctor Saleem Zaidi Ayurvedic Oil Which make White Hairs Black From Roots)
पैसे घालून महागडे तेल आणि शॅम्पू विकत घेण्यापेक्षा कढीपत्त्याच्या पानांचा वापर करा. कढीपत्त्याच्या पानांचा वापर केल्यानं केसांची वाढ चांगली होते. केसांसाठीचं हे ड्रिंक कसं तयार करायचं पाहूया. कंटेंट क्रिएटर प्रणालीनं आपल्या युट्यूब शॉर्ट व्हिडीओमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. हे ड्रिंक प्यायल्यानंतर केस गळणं कमी होतं आणि नवीन केस उगवण्यासही मदत होते. (Homemade Natural Hair Tonic)
केसांसाठी कढीपत्त्याचं हेअर टॉनिक कसं तयार करायचं?
केसांना मुळापासून मजबूत बनवण्यासाठी हे ड्रिंक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक पावडर तयार करा. तुम्हाला कढीपत्ता आणि ऑलिव्ह ऑईलची गरज लागेल. सगळ्यात आधी कढीपत्ता धुवून घ्या. नंतर एका कढईत ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात कढीपत्ता घाला. हे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत गरम करून घ्या.
नंतर थोडं थंड करून एका मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर तयार करून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. ज्यामुळे केस मजबूत होतील. कढीपत्ता चावून खाल्ला तरी केसांची वाढ होण्यास मदत होते.
कढीपत्ता खाणं केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतं. यात व्हिटामीन ए,बी, सी आणि ई, के यांसह आयर्न, कॅल्शियम आणि एंटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे केसांना मुळांपासून पोषण मिळते. तसंच कढीपत्ता ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत करतो ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि वेळेआधीच केस पांढरे होणं रोखता येतं.
ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी हेल्दी फॅट्स असतात आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यात व्हिटामीन ई असते. ज्यामुळे आतून पोषण मिळते. ऑलिव्ह ऑईलमुळे शरीराची सूज कमी होते, केस मुळांपासून मजबूत होतात. ऑलिव्ह ऑईल कोरड्या केसांची समस्या सोडवण्यास मदत करतो. स्काल्प हायड्रेट ठेवतो आणि हेअर फॉल कमी होतो.
