Lokmat Sakhi >Beauty > रोज शाम्पू लावून केस धुणं योग्य की अयोग्य? हेअर एक्सपर्टचा सल्ला, कुणासाठी योग्य आणि..

रोज शाम्पू लावून केस धुणं योग्य की अयोग्य? हेअर एक्सपर्टचा सल्ला, कुणासाठी योग्य आणि..

Hair Care Tips : एका पॉडकास्टमध्ये यूट्यूबर रणवीर इलाहाबादियानं भारतातील प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अरीका बंसल यांना हा प्रश्न विचारला की, 'रोज शाम्पू करावं की नाही?'. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:20 IST2025-06-23T12:18:29+5:302025-06-23T15:20:40+5:30

Hair Care Tips : एका पॉडकास्टमध्ये यूट्यूबर रणवीर इलाहाबादियानं भारतातील प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अरीका बंसल यांना हा प्रश्न विचारला की, 'रोज शाम्पू करावं की नाही?'. 

Doctor Arika Bansal tells daily shampoo is good or bad for hair | रोज शाम्पू लावून केस धुणं योग्य की अयोग्य? हेअर एक्सपर्टचा सल्ला, कुणासाठी योग्य आणि..

रोज शाम्पू लावून केस धुणं योग्य की अयोग्य? हेअर एक्सपर्टचा सल्ला, कुणासाठी योग्य आणि..

Daily Shampoo Good or Bad: घरातील मोठ्यांना तुम्ही नेहमीच हे सांगताना ऐकलं असेल की, रोज शाम्पूनं केस धुवून नये. असं केल्यानं केस पांढरे होतात आणि गळतात सुद्धा. पण खरंच असं होतं का? रोज शाम्पूनं केस धुवावे की नाही? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर याची उत्तरं आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इन्स्टाग्राम हॅंडल vocalwavehub वर एका पॉडकास्टमध्ये यूट्यूबर रणवीर इलाहाबादियानं भारतातील प्रसिद्ध हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अरीका बंसल यांना हा प्रश्न विचारला की, 'रोज शाम्पू करावं की नाही?'. 

या प्रश्नाचं उत्तर देत डॉ. अरीका सांगतात की, 'बालपणापासून हेच ऐकत आलो आहोत की, रोज शाम्पू केल्यानं केस गळतात किंवा पांढरे होतात. पण सायन्सचं यावर वेगळं मत आहे. जर तुम्ही फार ह्यूमिड, घाम येणाऱ्या किंवा धूळ असणाऱ्या वातावरणात राहत असाल तर रोज शाम्पूनं केस धुवायला हवेत. यानं नुकसान होणार नाही. पण जर रोज फक्त पाण्यानं केस धुवत असाल तर ही चुकीची पद्धत आहे.

फक्त पाण्यानं केस धुणं कसं घातक?

डॉ. अरीका सांगतात की, 'जसे तुम्ही पाण्यात जास्त वेळ हात ठेवले तर त्वचा फुगते, तसेच जर रोज भिजतील आणि स्वच्छ होत नसतील तर केस कमजोर होतील'. याचा अर्थ असा की, जर केसांवर फक्त पाणी टाकत असाल, ते स्वच्छ करत नसाल तर तुम्ही केसांना डॅमेज करताय.

आठवड्यातून कितीदा शाम्पू करावं?

डॉ. अरीका म्हणाल्या की, 'आठवड्यातून ४ ते ५ वेळा शाम्पू करणं योग्य राहतं. पण शाम्पूशिवाय केसांवर फक्त टाकणं पूर्णपणे चुकीचं आहे'.  अशात हवं तर तुम्ही रोज शाम्पू करा. पण याचाही विचार करा की, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता. तेथील प्रदूषणाचं प्रमाण, उष्णता, धूळ-माती म्हणजे वातावरण कसं आहे त्यानुसार ठरवा.

केसांबाबत सायन्सचं काय मत?

१) सायन्स आणि हेअर एक्सपर्ट्स सांगतात की, केस ड्राय आणि कुरळे असतील तर सगळ्यांनीच रोज शाम्पू करू नये. यानं केसांमधील नॅचरल ऑइल नष्ट होतं.

२) जर केसांवर तुम्ही कलर लावला असेल तर पुन्हा पुन्हा शाम्पू केल्यानं कलर लवकर उतरू शकतो.

३) जर तुमच्या डोक्याची त्वचा संवेदनशील असेल तर रोज शाम्पू केल्यानं त्वचा इरिटेट होऊ शकते. 

४) जर तुम्ही हार्श केमिकल असलेल्या शाम्पूचा वापर करत असाल तर केस तुटण्याचा धोका वाढतो.

Web Title: Doctor Arika Bansal tells daily shampoo is good or bad for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.