Join us

लिप बाम लावल्यानंतरही ओठ कोरडे पडतात-फुटतात? घरगुती उपाय, ओठ होतील मऊ-मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2025 17:05 IST

Dry lips home remedies: Cracked lips treatment: लिप बाम लावल्यानंतरही ओठ कोरडे पडत असतील किंवा फुटत असतील तर घरगुती उपाय करुन पाहा.

उन्हाळ्यात कोरड्या ओठांची किंवा फुटण्याची समस्या होते. (Dry lips home remedies) तर अनेकांना ओठांच्या समस्येला वर्षभर सामोरे जावे लागते.(Cracked lips treatment) कोणत्याही ऋतूमध्ये ओठ कोरडे पडणे किंवा फुटण्याची समस्या होत असते.(Soft lips naturally) अशावेळी आपण सगळ्यात आधी लावतो ते लिप बाम. फाटलेले ओठांना बर करण्यासाठी आपण त्यावर लिप बाम लावतो. (Lip care tips at home)ओठांच्या सौंदर्यामुळे आपला चेहरा उजळून निघतो.(Home remedies for chapped lips) पण ओठ फाटलेले किंवा कोरडे असतील तर चेहऱ्याचे रंग-रुप बदलते.(Natural lip care solutions) हल्ली बाजारात अनेक प्रकारचे लिप बाम पाहायला मिळतात. जे ओठांना मऊ आणि बरे करण्यास मदत करते.(DIY lip balm remedies) जर लिप बाम लावल्यानंतरही ओठ कोरडे पडत असतील किंवा फुटत असतील तर घरगुती उपाय करुन पाहा. 

उन्हाळ्यात 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल गारवा, जळजळ-टॅनिंग होईल कमी

त्वचारोगतज्ज्ञ पल्लवी अहिरे यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला त्या म्हणतात की, ओठांची त्वचा खूप नाजूक आणि कोरडी असते. ज्यामुळे ओठ कोरडे आणि खडबडीत होतात. यासाठी आपल्याला फक्त लिप बाम लावणे पुरेसे नाही. काही योग्य प्रकारची उत्पादने वापरणे देखील महत्त्वाचे आहे. त्या म्हणतात सतत लिप बाम लावल्याने ओठ कोरडे आणि फाटण्याची समस्या होते. यामुळे ओठांवर ओलाव्याची कमतरता जाणवते. 

1. बऱ्याचदा लिप बाममध्ये सुगंध, मेन्थॉल किंवा कापूरसारखी रसायने असतात, ज्यामुळे ओठांचे नुकसान होते. 

2. ओठांना सतत जीभ लावणे किंवा चावल्याने त्यांचा ओलावा निघून जातो. त्यामुळे ओठ फुटतात किंवा काळे पडतात. 

3. एसपीएफ लिप बामशिवाय उन्हात बाहेर जाणे टाळा. यामुळे ओठ फुटण्याची किंवा काळे पडण्याची समस्या अधिक वाढते. 

ओठांची काळजी घ्या

1. ओठांवर केमिकल फ्री, सुगंधमुक्त आणि एसपीएप असलेला लिप बाम वापरा. 

2. ओठ खाण्याची सवय सोडा, यामुळे कोरड्या ओठांची समस्या अधिक वाढू शकते. 

3. ओठांवर सतत लिपस्टिक लावत असाल तर ते कमी करण्यासाठी कोजिक ॲसिडी किंवा नियासिनमाइड असलेले लिप सीरम वापरा. 

4. तज्ज्ञ म्हणतात आपण जितकी त्वचेची काळजी घेतो तितकीच ओठांची देखील काळजी घ्यायला हवी. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीओठांची काळजी