आपल्या आजीला किंवा आईला वय विचारल्यावर लोकांची प्रतिक्रिया अशी असते की अजिबात वाटत नाही अगदी तरुण वाटता. (do you look older than your age? see the reasons, home remedies)मात्र अगदी त्या उलट तरुणींबाबत व्हायला लागले आहे. वीस वर्षाच्या मुली तीसच्या दिसतात तर तीस वर्षाच्या आणखी मोठ्या. वयाच्या आधीच म्हातारे दिसण्यामागे काही कारणे आहेत. ती कारणे जाणून घ्या. तुम्हीही वयापेक्ष जास्त मोठ्या दिसत असाल तर त्यामागे ही कारणे असू शकतात. वेळीच उपाय करा आणि कायम तरुण दिसा.
१. कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर सतत उन्हात फिरत असाल तर त्वचेवर सुरकुत्या तयार होतात. वय जास्त दिसायला लागते. त्वचा काळवंडते त्यामुळे उन्हात जाताना योग्य ती काळजी घ्यावी. चेहरा झाकावा तसेच टोपी घालावी. योग्य ते लोशन लावावे.
२. आजकाल मानसिक त्रासांचे प्रमाण वाढले आहे. अनेक महिला डिप्रेशनमदून जात असतात. ताणतणाव आणि अति विचार या गोष्टींमुळे वय जास्त दिसते. चेहरा मलूल दिसतो. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय करावेत. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
३. जास्त साखर खाल्याने त्वचा सुरकुतल्यासारखी दिसते. आहारावर अनेक गोष्टी निर्भर असतात. चुकीचा आहार घेणे आरोग्यासाठी जसे चांगले नाही तसेच सौंदर्यासाठीही नाही. चेहरा फुगतो आणि खराब दिसायला लागतो. तसेच तळलेले पदार्थ खाल्यानेही त्वचा खराब होते.
४. झोप अत्यंत महत्त्वाची. महिला योग्य झोप घेत नाहीत. शरीराला थकल्यावर गरजे पुरता आराम जर मिळाला नाही तर त्वचा थकल्यासारखी दिसायला लागते. डोळे बारीक होतात आणि चेहराही पडल्यासारखा दिसायला लागतो. त्यामुळे वय जास्त आहे असे वाटते.
५. वांशिक बाबही लक्षात घ्यायला हवी. त्यामुळेही चेहऱ्याचा आकार आणि त्वचा वेगळी दिसते. मात्र योग्य व्यायाम, आहार आणि इतर सवयींमुळे त्यावर नियंत्रण ठेवता येते.
६. अतिकामामुळेही माणूस थकतो. शरीराला आरामाची गरज असते. फक्त झोप नाही तर आनंदाचे क्षण आयुष्यात असायला हवेत. वेळोवेळी ब्रेक घ्यावे. सुट्टीच्या दिवशी आनंददायी कृती कराव्यात. छंद जोपासावा आणि फिरायलाही जावे. सतत काम केल्यामुळे चेहरा मलूल दिसतो. त्यामुळे वयस्कर असल्यासारखे दिसता.