तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या ओठांवर मेलेल्या किड्याची पूड असू शकते ते? आपल्याकडे लिपस्टिकचा सगळ्यात जास्त चालणारा रंग म्हणजे लाल.(Do you like to wear red lipstick?... then read this) भारतात लालच्या शेड्स खूप वापरल्या जातात. सौंदर्य संसाधनांचा वापर महिला सातत्याने करतात. हे प्रोडक्ट्स खूप महाग असतात. चांगल्या कंपनींचे वापरायचे म्हटले तरी ते परवडत नाही. मग मुली बाजारात मिळणाऱ्या स्वस्तातल्या लिपस्टिक्स वापरतात.(Do you like to wear red lipstick?... then read this) पण त्या ओठांसाठी चांगल्या नाहीत. त्या चांगल्या आहेत का नाही कसं कळणार? स्वस्तातली काय आणि महाग काय विसरून जा. लाल रंगाची लिपस्टिकच वापरणंच सोडाल हे वाचल्यानंतर.
लिपस्टिकमध्ये कर्माइन नावाचे रसायन असते. आपल्याला वाटतं इतर रसायनांसारखंच काही तरी असेल. पण कर्माइन एका किड्यापासून तयार केले जाते. कोचीनियल नावाच्या एका किड्यापासून ते तयार केले जाते. हा किडा स्टर्नोरायन्चा उपखंडातील कीटक आहे. हे किडे गोळा केले जातात. नंतर गरम पाण्यात उकळवले जातात. या दरम्यान गरम पाण्यामुळे त्यांचा मृत्यु होतो. बऱ्याच वेळासाठी ते सूर्यप्रकाशात वाळवले जातात. नंतर वाळलेल्या किड्यांची पावडर तयार केली जाते. ती लाल पावडर पुन्हा सोडियम कार्बोनेटच्या द्रावणात उकळवतात. हे द्रव्य गाळून घेतले जाते. त्यामधील वाटले न गेलेले तुकडे काढून टाकले जातात. नंतर त्यात तुरटी घालतात. तयार मिश्रण धुऊन घेतले जाते. मग ते पुन्हा वाळवतात. या पद्धतीने कर्माइन तयार केले जाते.
कर्माइन वापरणाऱ्या कंपनी जेव्हा नैसर्गिक रंग वापरण्याचा दावा करतात, तेव्हा तो नैसर्गिक रंग पाना-फुलांचा नसून या किड्यापासून तयार केलेला असतो. या पद्धतीचा वापर करणाऱ्या कंपन्यांची नावं वाचून तर धक्काच बसेल. फक्त लाल लिपस्टिक नाही तर, इतरही ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये याचा वापर केला जातो. तुम्हीसुद्धा जर कर्माइन असलेले प्रोडक्ट वापरत असाल तर नोंद घ्या. त्यात मेलेल्या किड्याची पावडर आहे. गुगलवर विकिपिडियामध्ये सगळी माहिती आहे. अनेक लिपस्टिक तयार करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या या पद्धतीचा वापर करतात. लाल लिपस्टिक वापरायच्या आधी त्यातील रसायनांची नावे वाचा. तुम्ही ओठांवर मेलेल्या किड्याची पूड लावत आहात हे लक्षात असू द्या. अशी संसाधने वापरायची का नाही तुम्हीच ठरवा.