Join us

स्क्रिन पाहून थकलेल्या डोळ्यांसाठी आठवड्यातून दोनदा करा ‘हा’ घरगुती उपाय, डोळे राहतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 18:04 IST

Do this home remedy twice a week for tired eyes, your eyes will remain beautiful : डोळ्यांवर सतत ताण येतो आणि त्रास होतो? करा हा सोपा उपाय.

दिवसभर काम करुन शरीर थकते. मात्र आजकालच्या जीवनशैलीत शरीरापेक्षा जास्त कष्ट डोळ्यांना असतात. अनेकांचे काम ८ ते ९ तास संगणकावर असते. सतत लॅपटॉप वापरावा लागतो. तसेच मोबाइल आणि टीव्हीच्या स्क्रिनकडे पाहावे लागते. (Do this home remedy twice a week for tired eyes, your eyes will remain beautiful)त्यामुळे डोळ्यांवर सतत ताण येतो. सगळ्याच क्षेत्रात काम करताना कोणते तरी उपकरण वापरावे लागतेच. ज्याचा परिणाम जोळ्यांवर होतो. तसेच दिवसातला बराच वेळ मोबाइल वापरण्यात जातो. बराच वेळ स्क्रीनसमोर बसल्यामुळे डोळ्यांना कोरड पडते. डोळे सतत लालसर दिसतात. डोळ्यातून पाणी येणे, डोकेदुखी आणि थकवा अशी अनेक लक्षणे जाणवतात. स्क्रीनमधून येणाऱ्या ब्लू रेजमुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि दृष्टीवरही परिणाम होऊ लागतो. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती देणे आणि त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

काही सोपे घरगुती उपाय करुन हा त्रास कमी करता येतो. फार काही कष्ट किंवा महागडे उपाय करायची गरज नाही. फक्त काही साधे उपाय करा त्यापैकीच एक फार प्रभावी असा उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा रात्री झोपण्यापूर्वी काकडीचे पातळ काप करुन डोळ्यांवर ठेवणे. हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. काकडीत असलेले पाणी आणि शीतल गुणधर्म डोळ्यांचा ताण कमी करतात. काकडीमुळे डोळ्यांभोवतीची सूज, काळी वर्तुळे आणि कोरडेपणा कमी होतो. यामुळे डोळ्यांना नैसर्गिक थंडावा मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

यासोबतच गुलाबपाणी लावल्याने त्वचेला आणि डोळ्यांभोवतीच्या संवेदनशील भागाला विशेष आराम मिळतो. गुलाबपाणीतील नैसर्गिक घटक त्वचेला हायड्रेट करतात. सूज कमी करतात आणि डोळे मस्त सुंदर दिसतात. डोळ्यांवरचा थकवा कमी होतो. झोपण्यापूर्वी हा उपाय केल्याने दिवसभराचा ताण आणि थकवा कमी होतो, डोळ्यांना थंडावा मिळतो आणि पुढील दिवसासाठी ते तयार होतात.

आजच्या डिजिटल युगात डोळ्यांवर येणारा ताण टाळणे अवघड असले तरी असे छोटेसे घरगुती उपाय डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी आरोग्यदायी ठरतात. तसेच डोळ्यांना त्यामुळे आराम मिळतो. असे उपाय नक्की करुन पाहा. करायला सोपे असतात आणि प्रभावीही असतात. मुख्य म्हणजे त्याचे काही दुष्परिणाम नाहीत. 

टॅग्स :डोळ्यांची निगाब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल