Lokmat Sakhi >Beauty > भोपळ्याच्या बियांमुळे केस होतात मजबूत? पाहा रोज भोपळ्याच्या बिया खाल्या तर काय होईल

भोपळ्याच्या बियांमुळे केस होतात मजबूत? पाहा रोज भोपळ्याच्या बिया खाल्या तर काय होईल

Do pumpkin seeds make hair stronger? See what happens if you eat pumpkin seeds every day : रोज भोपळ्याच्या बिया खाणे ठरते आरोग्यासाठी फायद्याचे. तसेच केसांसाठी असतात उपयुक्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 18:52 IST2025-05-14T18:51:41+5:302025-05-14T18:52:45+5:30

Do pumpkin seeds make hair stronger? See what happens if you eat pumpkin seeds every day : रोज भोपळ्याच्या बिया खाणे ठरते आरोग्यासाठी फायद्याचे. तसेच केसांसाठी असतात उपयुक्त.

Do pumpkin seeds make hair stronger? See what happens if you eat pumpkin seeds every day | भोपळ्याच्या बियांमुळे केस होतात मजबूत? पाहा रोज भोपळ्याच्या बिया खाल्या तर काय होईल

भोपळ्याच्या बियांमुळे केस होतात मजबूत? पाहा रोज भोपळ्याच्या बिया खाल्या तर काय होईल

केस गळणे ही सध्या फार मोठी समस्या आहे. महिला काय आणि पुरुष काय सगळ्यांचेच केस भरपूर गळतात. (Do pumpkin seeds make hair stronger? See what happens if you eat pumpkin seeds every day)एकदा का तीशी उलटून गेली की केस पिकायला लागतात किंवा गळायला लागतात असे म्हटले जाते. मात्र वयाच्या वीसाव्या वर्षीही झपाट्याने केस गळतात. तरुण मुला मुलींमध्ये ही समस्या वाढतंच आहे. त्याला कारणे अनेक आहेत. बदलेली जीवनशैली ही सगळ्या समस्यांचे मुळ आहे. तसेच आहारातील बदलही आरोग्यासाठी वाईट ठरु शकतो. आजकाल नाईट लाइफ ही संकल्पना फार लोकप्रिय आहे. तरुण मुल-मुली अख्खी रात्र जागून काढतात. झोपायला रोज १ किंवा २ वाजतात त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते त्याचाही परिणाम केसांवर होतो. 

अनेक कारणे आहेत. त्यासाठी उपायही आपण विविध करतो. आहारात बदल करतात. वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंट करुन पाहतात. (Do pumpkin seeds make hair stronger? See what happens if you eat pumpkin seeds every day)तसेच डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेली औषधे घेतात. अनेक प्रकारे केस वाचवण्याचा प्रयत्न लोक करत असतात. आहारात जर अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करत असाल तर हा एक पदार्थ अजिबात विसरू नका. केसांसाठी अगदी फायदेशीर असणाऱ्या या बिया खाणे केसांसाठी पोषक ठरेल. 

भोपळ्याच्या बिया चवीला छान लागतात. गोड पदार्थांमध्ये या बिया घातल्या जातात. तसेच मुखवासात या बिया असतात. इतरही काही पदार्थांमध्ये या बिया वापरल्या जातात. नुसत्या खायलाही काहींना आवडतात. रोज चार ते पाच भोपळ्याच्या बिया खाल्याने आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरतेच मात्र त्याचा केसांनाही फायदा होतो. बाजारात या बिया आरामात मिळतात. फार माहागही नसतात. रोज खाल्याने काही तोटाही होत नाही. 

 भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ असते त्यामुळे केस गळायचे थांबतात. त्यात जीवनसत्व इ असते. केसांसाठी फार गरजेचे असते. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. झिंक केसांसाठी फायद्याचे असते. या बिया मॅग्नेशियमने परिपूर्ण असतात त्यामुळे त्या खाणे पोषक ठरते. केस फक्त गळायचे थांबत नाहीत तर चमकतातही. केस मजबूत होतात. त्यामुळे रोज भोपळ्याच्या बिया खाणे हा केसांच्या वाढीसाठीचा अगदी सोपा उपाय आहे.    

Web Title: Do pumpkin seeds make hair stronger? See what happens if you eat pumpkin seeds every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.