Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर खरंच पिंपल्स येतात? पाहा आंबा खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत, पिंपल्स टाळण्यासाठी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 15:30 IST

Side effects of eating too many mangoes: Right way to eat mango in summer: प्रसिद्ध आहारातज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांनी सांगितलं की कोणत्या पदार्थांसोबत आंबा खाऊ नये. चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स येऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी पाहूया.

फळांचा राजा मानला जाणारा आंबा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे त्याची ओढ सर्वांनाच असते. रसाळ हापूस असो वा गोड पायरी, आंब्याचा आस्वाद घेतल्याशिवाय उन्हाळा पूर्ण होत नाही. पण आंबा खाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उद्भवतो की चेहऱ्यावर पिंपल्स येतील का? तरुण मुला-मुलींमध्ये ही शंका जरा जास्त मोठ्या प्रमाणात असते. काही लोक तर उष्णतेच्या भीतीमुळे हे फळ खाणं सोडतात. (Side effects of eating too many mangoes)आंबा या फळात व्हिटॅमिन ए, सी आणि अँटी-ऑक्सिडंट्चा खजिना आहे. आंबा खाल्ल्यानंतर लगेच काहींच्या त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स दिसू लागतात.(Right way to eat mango in summer) पण हे सगळं चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे होते. आंबा खाण्याची योग्य वेळ, पद्धत आणि काही गोष्टींची काळजी घेतल्यास पिंपल्स येणारं नाही. प्रसिद्ध आहारातज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांनी सांगितलं की कोणत्या पदार्थांसोबत आंबा खाऊ नये. चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स येऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी पाहूया.

साडी १ - ड्रेस ७, जुन्या खणाच्या साडीतून शिवा ७ डिझायनर इंडो-वेस्टन ड्रेस, कमी बजेट- लूक स्टायलिश 

1. आंबा हा निसर्गत: उष्ण प्रवृत्तीचा आहे. जेव्हा आपण एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आंबे खातो, तेव्हा शरीरातील तापमान वाढते. ही उष्णता त्वचेद्वारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे पुरळ किंवा पिंपल्स येतात. तसेच, आंब्याचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' थोडा जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढून सिबम वाढते ज्यामुळे पिंपल्स उद्भवतात. 

2. आंबा खाण्यापूर्वी किमान १ ते २ तास थंड पाण्यात भिजत ठेवावा. यामुळे आंब्यातील फायटिक अॅसिड निघून जाते. ज्यामुळे त्याची नैसर्गिक उष्णता कमी होते. यामुळे पचन सुधारते आणि त्वचेवर पुरळ येत नाही. 

3. आंबा कधीही जेवताना किंवा जेवणानंतर लगेच खाऊ नका. जेवल्यानंतर आंबा खाल्ल्याने पचनक्रियेवर ताण येतो आणि शरीरातील उष्णता वाढते. आंबा खाण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी दोन तासांचा मधला काळ. कधीही रिकाम्या पोटी आंबा खाऊ नका. 

4. आमरस करताना त्यात थोडे दूध आणि तूप घातल्यास त्याची उष्णता कमी होते. तसेच आंबा खाल्ल्यानंतर ग्लासभर तास किंवा पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील पित्त संतुलित राहते.

5. एकाच वेळी ३ ते ४ आंबे खाणे टाळा. दिवसातून १ किंवा दोन आंबे खाणे केव्हाही चांगले. अतिसेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते, जी पिंपल्ससाठी कारणीभूत ठरते.  आंबे खाताना तेलकट पदार्थ खाऊ नका. यामुळे त्वचेचे विकार होतील. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mangoes and Pimples: Right time to eat & tips to avoid.

Web Summary : Mangoes can cause pimples if consumed incorrectly. Soak mangoes before eating. Avoid eating with meals. Have with milk/ghee. Limit intake to one or two a day and avoid oily foods. Follow these tips for healthy skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआंबाहोम रेमेडी