आपण किती थकलो आहेत हे आपल्या चेहऱ्यावरुन सहज समजून येते. (Diwali Skin care Tips) परंतु, अनेकदा आपल्या फ्रेश जरी वाटतं असलं तरी आपला चेहरा काही फ्रेश दिसत नाही. (Masoor dal face pack benefits) दिवसभराचं काम, धावपळ, मुलांच्या शाळा, अभ्यास, घर आवरणं या साऱ्यातच गृहिणींचा अर्धावेळ निघून जातो. (Masoor dal for skin whitening)अशावेळी त्यांना स्वत:कडे फारसं लक्ष देता येत नाही. चेहऱ्याचा थकवा, टॅनिंग आणि डेडस्किन ही सध्या अनेकांच्या दैनंदिन समस्यांचा भाग झाली आहे.(Natural glow face pack) उन्हात जाणं, प्रदूषण, झोपेची कमतरता, पुरेसा आहार न घेणे आणि स्ट्रेबस यामुळे आपल्या चेहऱ्यासह आरोग्यावर देखील परिणाम होतो. (Homemade face pack for instant glow)
चेहऱ्यासाठी बाजारात मिळणाऱ्या स्किन केअर क्रीम्स, सीरम्स आणि पॅकवर अधिक पैसे खर्च करुन सुद्धा आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. (Remove dead skin naturally at home) पण ग्लो मिळवण्यासाठी पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करु शकतो. (Masoor dal skincare routine) मसूर डाळीमध्ये काही पदार्थ कालवून चेहऱ्याला लावल्यास टॅन आणि डेडस्किन निघून जाण्यास मदत होईल. हा फेसपॅक कसा करायचा पाहूया. (Instant glow home remedies)
चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी आपल्याला मसूरची डाळ आणि तांदूळ वेगवेगळ्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवा. नंतर त्यांना मिक्सरमध्ये बारीक करुन पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये दही आणि मध मिसळा. आपल्या चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. सुकल्यानंतर आपल्या बोटांना ओले करुन चेहऱ्यावर हलक्या हातांनी घासा. ज्यामुळे चेहरा पूर्णपणे एक्सफोलिएट होण्यास मदत होईल. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा आणि नंतर चेहऱ्यावर गुलाबजल लावा. यामुळे चेहरा स्वच्छ होईल.
मसूर डाळ चेहऱ्यावर लावल्याने त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. यात नैसर्गिक व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करतात. यामुळे मृत पेशी काढून टाकण्यास आणि मुरुमे कमी करण्यास मदत होते.
दह्यामध्ये प्रोबायोटिक समृद्ध लॅटिक असते. जे त्वचेला खोलवर हायड्रेट करण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होतो. दह्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते, ओलावा टिकून राहतो आणि नैसर्गिकरित्या चमकते. मध हे त्वचेला मऊ आणि चमकदार करते. त्वचेला निरोगी आणि मॉइश्चरायझर करते. ज्यामुळे त्वचा उजळतो.