बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत तिची बहीण खुशबू पटानीही अनेकदा चर्चेत असते. फिटनेस, साधी जीवनशैली आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे खुशबू सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.(Disha Patani sister beauty secret) कोणताही हेवी मेकअप न करता तिची त्वचा नेहमीच स्वच्छ, तजेलदार आणि ग्लोइंग दिसते. अनेक जण विचारतात की, तिच्या सुंदर त्वचेचं आणि फ्रेश लूकचं गुपित नक्की काय आहे. (Natural beauty tips)
अलीकडेच खुशबूने तिच्या चमकदार त्वचेचे आणि चांगल्या आरोग्याचे एक खास 'देसी रहस्य' चाहत्यांसोबत शेअर केले आहे. थंडीच्या दिवसांत शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी ती एका विशेष काढ्याचा वापर करते, जो केवळ लिव्हरसाठीच नाही तर सौंदर्यासाठीही तितकाच प्रभावी आहे. हा काढा शरीराला फक्त आतून मजबूत करत नाही तर त्वचा, केस आणि पचनासाठी देखील फायदेशीर आहे. जाणून घेऊया या विषयी.
या आयुर्वेदिक पेयामध्ये हळद आणि आवळ्यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे. आवळ्यात व्हिटॅमिन सी आहे तर हळदीमध्ये कर्क्यूमिन दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. याचे पेय प्यायल्याने शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. हा काढा रोज प्यायल्याने आपली प्रतिकारशक्ती सुधारु शकते. तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते. हा काढा कसा बनवायचा पाहूया.
यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये गरम पाणी ठेवावे लागेल. यानंतर कच्च्या हळदीचा तुकडा किसून घ्या. नंतर आवळा अर्धा किसून घ्या. दोन्ही घटक पाण्यामध्ये घालून उकळवा. थोड्या वेळाने गॅस बंद करुन ग्लासमध्ये गाळून घ्या.
हे डिटॉक्स ड्रिंक रोज प्यायाल्याने लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होईल. हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी हे पेय फायदेशीर आहे. हळदीमुळे शरीरातील जळजळ कमी होते. तसेच त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. हे पेय प्यायाल्याने आपले आतडे स्वच्छ होतात. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. सकाळी रिकाम्या पोटी हळद आणि आवळ्याचा काढा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. काढा हा कोणताही रामबाण उपाय नसून शरीरासाठी नैसर्गिक सवय आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. कोणतीही दीर्घकालीन समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
