केसांच्या समस्येचा सामना आजकाल प्रत्येकालाच करावा लागतो. (Hair Care Tips) फक्त सर्व सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटींनाही केस गळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. बरेचजण जुन्या काळात फॉलो केले जाणारे घरगुती आजही करतात. या घरगुती उपायांनी केसांना कोणतंही नुकसान होत नाही आणि केसांची वाढही चांगली होते. अभिनेत्री दिशा पाटनी ही अभिनयासह तिच्या स्टायलिश राहणीमानामुळे सर्वांमध्ये लोकप्रिय आहे. (Disha Patani Mother Makes This Homemade Hair Oil For Hair Growth)
दिशा पाटनीची आईसुद्धा केसांना लावण्यासाठी घरगुती तेल तयार करते. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर दिशाची मोठी बहीण खुशबू पाटनीनं शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशाची आई केसांसाठी घरगुती तेल बनवत आहे. हे तेल तयार करण्यासाठी त्यांनी फूलं आणि पानांचा वापर केला आहे. हे हेअर ऑईल कसे बनवायचे, याचे फायदे समजून घेऊ.
दिशाच्या आईनं घरगुती तेल कसं तयार केलं?
हे तेल बनवण्यासाठी दिशा आणि खुशबूच्या आईनं कांदा, कढीपत्ता, मेथीचे दाणे, जास्वंदाची फुलं हे साहित्य घेतले आहे. २५० ग्राम नारळाच्या तेलात २ कांदे, २ मूठ कडीपत्ते आणि मूठभर जास्वंदाची फुलं, ४ चमचे मेथीचे दाणे घेतले आहे. हे साहित्य एका भांड्यात पाणी ठेवून एकत्र उकळवून घ्या. जोपर्यंत कांदा पूर्ण शिजत नाही तोपर्यंत हे पदार्थ पाण्यात व्यवस्थित उकळवून घ्या. मंद आचेवर शिजवल्यानंतर गाळून घ्या.
या तेलानं काय फायदे मिळतात? (Benefits Of Homemade Hair Oil)
हे तेल एंटी इंफ्लेमेटरी गुणांनी परीपूर्ण आहे. कांद्यातील सल्फर आणि नारळाचं तेलातील फॅटी एसिड्स केसांसाठी फायदेशीर ठरते. हे तेल केसांना लावल्यानं केसांची वाढ व्यवस्थित होते आणि केस वाढण्यास मदत होते.
केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही हे तेल केसांना लावू शकता. हे तेल नियमित केसांना लावल्यानं केस गळणं कमी होतं. केस तुटत नाही आणि केसांना मजबूती मिळते, केस चमकदार होतात, केसांना मऊपणा येण्यासाठी हे तेल उत्तम आहे.
या तेलामुळे केसांना डिप कंडिशनिंग मिळते. योग्य प्रमाणात मॉईश्चर टिकून राहते. स्काल्प हेल्दी ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरेत. या तेलानं स्काल्प इंफ्लेमेशन कमी होते ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही,
या तेलाच्या वापरानं अकाली पांढरे होण्याची समस्या टाळता येते. नारळाचं तेल आणि कढीपत्त्याच्या पानांच्या कॉम्बिनेशनमुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत होते.