Lokmat Sakhi >Beauty > दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

Beauty Your Daily Dose Of Youth Eat Sattu With Yogurt Daily To Fight Aging & Stay Youthful : Eat these foods to look younger : Discover the Benefits of Sattu for Every Day Wellness : Best Anti-Aging Foods for Healthy and Youthful Skin : वयोमानानुसार, त्वचेत बदल होत जातो, त्वचेला कायम तरुण ठेवण्यासाठी करा हा सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2025 09:35 IST2025-04-27T09:30:00+5:302025-04-27T09:35:01+5:30

Beauty Your Daily Dose Of Youth Eat Sattu With Yogurt Daily To Fight Aging & Stay Youthful : Eat these foods to look younger : Discover the Benefits of Sattu for Every Day Wellness : Best Anti-Aging Foods for Healthy and Youthful Skin : वयोमानानुसार, त्वचेत बदल होत जातो, त्वचेला कायम तरुण ठेवण्यासाठी करा हा सोपा उपाय...

Discover the Benefits of Sattu for Every Day Wellness Daily Dose Of Youth Eat Sattu With Yogurt Daily To Fight Aging & Stay Youthful Eat these foods to look younger | दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

वाढत्या वयोमानानुसार आपल्या त्वचेत देखील अनेक बदल होत जातात. वाढत्या वयाचा परिणाम हळूहळू आपल्या त्वचेवर देखील दिसू लागतो. वय वाढलं की त्वचा सैल पडते, त्वचेवर सुरकुत्या, बारीक (Discover the Benefits of Sattu for Every Day Wellness) रेषा आणि एजिंगच्या खुणा वाढू लागतात. अशावेळी प्रत्येकीला आपली त्वचा तरुणपणी होती अगदी तशीच कायम राहावी असे वाटेत. आपल्या त्वचेच तारुण्य कायम राखण्यात कॉलेजन हा घटक महत्वाची भूमिका निभावतो(Daily Dose Of Youth Eat Sattu With Yogurt Daily To Fight Aging & Stay Youthful).

परंतु वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात कॉलेजन नैसर्गिक पद्धतीने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते, आणि यामुळेच आपल्या त्वचेत अनेक बदल घडून येतात. अशा परिस्थितीत, त्वचेचे तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी शरीरातील कॉलेजनची पातळी वाढवणे गरजेचे असते. यासाठी, शक्यतो बहुतेकजणी कॉलेजनयुक्त महागड्या क्रीम्स, लोशन, ब्यूटी ट्रिटमेंट्स करुन घेतात. परंतु याचा परिणाम काही काळापुरताच मर्यादित असतो. याउलट आपण रोजच्या डाएटमध्ये काही नैसर्गिक पदार्थांचा (Best Anti-Aging Foods for Healthy and Youthful Skin) समावेश करून शरीरातील कॉलेजनची पातळी वाढवू शकतो. यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल ते पाहूयात. 

त्वचेचे तारुण्य टिकवण्यासाठी करा हा खास उपाय... 

आपल्या शरीरातील कॉलेजनची पातळी वाढवून नैसर्गिक पद्धतीने आपण त्वचेला कायम तरुण ठेवू शकतो. यासाठी तुम्हाला रोजच्या जेवणात, वाटीभर दह्यात चमचाभर भाजलेले सातूचे पीठ कालवून खायचे आहे. खरंतर, सातूचे पीठ हे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील तितकेच गुणकारी मानले जाते. सातूचे पीठ हे प्रोटिन्सचा एका उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. आपल्यापैकी बरेचजण उन्हाळ्यात सातूचे पीठ खाण्याला प्राधान्य देतात. सातूचे पीठ आपल्या शरीरात कॉलेजीनचे प्रमाण वाढवण्याचे मुख्य कार्य करते. विशेषतः सातूच्या पिठामध्ये असणारे ग्लायसिन आणि प्रोलाइन सारखे अमीनो आम्ल कोलेजन वाढवण्यास मदत करतात.  

विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

  

प्रोटिन्सव्यतिरिक्त, सातूमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि लोह कॉलेजनच्या निर्मितीस मदत करतात. अशा परिस्थितीत, सातूचे पीठ त्वचेच्या आणि पेशींच्या दुरुस्तीमध्ये देखील मदत करते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि घट्ट राहते. 

उन्हाळ्यांत प्या सातूच्या पीठाचे थंडगार ताक! पोटाला थंडावा आणि शरीराला तकवा देणारा सोपा पदार्थ...

उन्हाळ्यात पचन सुधारण्यासाठी डिंक खा आणि चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यालाही लावा, पाहा डिंकाचा भन्नाट उपाय...

उन्हाळ्यात थंडावा देणारे दही शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. शिवाय, ते त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. पोटाला थंडावा देण्यासोबतच ते त्वचा तरुण आणि चमकदार बनवण्यास देखील मदत करते, कारण त्यात असलेले प्रथिने कोलेजन उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. याव्यतिरिक्त, दह्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे कॉलेजीनचे प्रमाण कमी होण्यास रोखतात. 

दही आणि सातूचे पीठ खाण्यासाठी सर्वात आधी सातूचे पीठ हलकेच भाजून घ्यावे. मग दही चांगले फेटून घ्यावे. फेटलेल्या दह्यात भाजलेले सातूचे पीठ घालून गुठळ्या मोडून घ्याव्यात. मग यात आपल्या आवडीनुसार चाट मसाला, चवीनुसार मीठ घालूंन खावे. आपण कोशिंबीर किंवा बुंदी रायत्यात देखील हे दही घालून खाऊ शकता. दह्यासोबतच आपण सातूच्या पिठाचे ताक करून देखील पिऊ शकता.

Web Title: Discover the Benefits of Sattu for Every Day Wellness Daily Dose Of Youth Eat Sattu With Yogurt Daily To Fight Aging & Stay Youthful Eat these foods to look younger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.