आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या डोळयांखाली बहुतेकदा डार्क सर्कल्स येतात. डोळ्यांखालील डार्क सर्कल्सची समस्या फारच कॉमन असली तरी, हे डार्क सर्कल्स होण्याची कारणे मात्र अनेक (what causes dark circles under eyes) असू शकतात. बरेचदा डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कल्सकडे आपण दुर्लक्ष करतो. डार्क सर्कल्स येण्याची करणे वेगवेगळी असली तरी आपण झोपेची कमतरता किंवा थकवा हीच दोनच मुख्य कारणं समजतो. परंतु हे डार्क सर्कल्स फक्त थकवा (different types of dark circles under eyes) किंवा झोपेची कमतरता असल्याचे संकेत नसून ते शरीराच्या आत सुरू असलेल्या (vitamin deficiency causing dark circles) बिघाडाचे थेट संकेत असू शकतात. खरंतरं, डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कल्सच्या वेगवेगळ्या रंगांमधून आपल्या शरीरातील काही गंभीर समस्या किंवा कमतरता दिसून येऊ शकतात.
डार्क सर्कल्सच्या काळसर, निळसर, तपकिरी किंवा लालसर छटा शरीरात कोणत्या कमतरतेचे किंवा असंतुलनाचे संकेत देतात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भात, न्यूट्रिशनिस्ट सलोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या सांगतात की, बऱ्याचवेळा डार्क सर्कल्स हे शरीराच्या अंतर्गत बिघाडाचे संकेत देऊ शकतात. काहीजणांच्या डोळ्यांखाली निळे डार्क सर्कल्स दिसतात, तर काहींचे डार्क सर्कल्स गडद तपकिरी रंगाचे असतात. हे वेगवेगळे रंग वेगवेगळे संकेत देतात, डार्क सर्कल्सचे बदलते रंग नेमकं काय सांगतात ते पाहूयात.
१. निळ्या/जांभळ्या रंगाचे डार्क सर्कल्स :- न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर तुमच्या डोळ्यांखाली निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे डार्क सर्कलस दिसत असतील, तर ते शरीरात कमी झालेल्या लोहाचे संकेत असू शकतात. यासाठी उपाय म्हणून तुम्ही लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खावेत. पालक, डाळिंब, डाळी, बीट असे पदार्थ भरपूर प्रमाणांत खावेत. त्याचबरोबर, व्हिटॅमिन 'सी' देखील गरजेचे असते ज्यामुळे शरीरात लोहाचे शोषण व्यवस्थित होईल. डोळ्यांखाली हलका मसाज आणि कॅफीनयुक्त आय क्रीम लावणे देखील फायदेशीर ठरू शकते.
२. डार्क ब्राऊन रंगाचे डार्क सर्कल्स :- डार्क ब्राऊन रंगाचे डार्क सर्कल्स शक्यतो पिगमेंटेशनमुळे येतात. यासाठी रोज सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. त्वचेला उजळवणारे घटक, जसे की व्हिटॅमिन 'सी', नायसिनामाइड आणि कोजिक ऍसिड यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावा! केसांवर दिसेल कमालीचा फरक - वाटेल आधीच का नाही केला उपाय...
चहा पावडरचा सुपरहिट हेअर कलर! केसांवर येईल सुंदर रंग - पार्लरचा खर्च वाचेल असा बजेट फ्रेंडली उपाय...
३. निळ्या/जांभळ्या रंगाचे डार्क सर्कल्स :- कधीकधी त्वचा पातळ झाल्यामुळे किंवा रक्तभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे देखील डार्क सर्कल्स निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे दिसू शकतात. यासाठी व्हिटॅमिन 'के' आणि हायल्यूरोनिक अॅसिड असलेली क्रीम लावणे फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त, थंड टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्यास सूज आणि गडदपणा कमी होतो. उत्तम परिणामांसाठी कोलेजन वाढवणारे पदार्थ, जसे की सोया आणि नट्स खाणे फायदेशीर ठरेल.
४. डोळ्यांना येणारी सूज :- आहारात जास्त मिठाचा वापर, अल्कोहोल किंवा वॉटर रिटेन्शनमुळे डोळे सूजलेले आणि जड वाटतात. आहारात मीठ आणि अल्कोहोलचे प्रमाण कमी करा. काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने सूज लवकर कमी होते. झोपताना डोके थोडे वर (उंच) ठेवून झोपणे देखील एक चांगला उपाय आहे.
५. डोळ्यांखाली खड्डे :- या सर्वांपेक्षा वेगळे म्हणजे, काहीजणांच्या डोळ्यांखाली खड्ड्यांसारखा भाग दिसतो. याचे कारण कोलेजनची कमतरता असू शकते. यासाठी रेटिनॉल, व्हिटॅमिन सी, आणि व्हिटॅमिन ई असलेली क्रीम वापरावी. यासोबतच, न्यूट्रिशनिस्ट आहारात प्रोटीन आणि कोलेजन सप्लीमेंट्सचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
न्यूट्रिशनिस्ट सोनम सांगतात की, डार्क सर्कल्सकडे दुर्लक्ष करू नये. हे शरीरातील पोषणाची कमतरता, लाईफस्टाईल मधील चुका आणि त्वचेच्या आरोग्याबद्दल वेगवेगळे संकेत देऊ शकतात. योग्य आहार, त्वचेची काळजी आणि आरोग्यदायी सवयी यांच्या मदतीने यांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येऊ शकते.