Oil For Hair Fall: आजकाल खाण्या-पिण्यापासून लाइफस्टाईलपर्यंत सगळंच बदललं आहे. आधीसारखं पोषण आहारात शिल्लकच राहिलेलं नाही. सगळं हायब्रिड खायला मिळतं आहे. केमिकल्सचा मारा जास्तीत जास्त केला जात आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषण अजिबात मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढलाय, सोबतच अनेकांना केसगळतीची मोठी समस्या जाणवत आहे. कमी वयातच टक्कल पडत असल्याने-केस विरळ होत असल्याने महिलांसोबतच पुरूषही चिंतेत आहेत.
काही लोकांचं असं मत असतं की डँड्रफ जास्त झाला की हळूहळू टक्कल पडायला सुरुवात होते. तर काहींचं म्हणणं असतं की योग्य तेल न लावल्यामुळे केस गळतात. साधारणपणे लोक मोहरीचं, आवळ्याचं तेल, एरंडेल, बदामाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल वापरतात. मात्र त्वचारोगतज्ज्ञ रुबेन भसीन यांच्या मते केस गळण्याचा थेट संबंध तेलाशी नाही. तेल लावल्यामुळे केस गळत नाहीत, तर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते.
डर्मेटोलॉजिस्ट रुबेन भसीन यांच्या मते केस गळणे थांबवण्यासाठी कोणतेही एक जादुई तेल नाही. खोबऱ्याचं तेल, आवळ्याचे तेल, भृंगराज तेल आणि एरंडेल तेल यांसारखी अनेक तेले केसांसाठी फायदेशीर असतात. या तेलांनी केसांना पोषण मिळतं, केस मजबूत होतात आणि मुळांना बळकटी मिळते. मात्र तेल योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी वापरणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की तेल नेहमी आंघोळीच्या ३० मिनिटे आधी लावावे आणि आंघोळीच्या वेळी केस नीट धुवावेत.
केस का गळतात?
रुबेन भसीन यांच्या मते जे लोक सतत केसांना तेल लावून ठेवतात, ते केस गळण्याचं एक मुख्य कारण ठरू शकतं. केसांमध्ये तेल लावले असेल तर ते आंघोळीपूर्वी काही वेळ लावावे आणि आंघोळीच्या वेळी ते पूर्णपणे धुवून काढावे. कारण तेल दीर्घकाळ टाळूवर राहिल्यास फंगल इन्फेक्शन, डँड्रफ आणि खाज येऊ शकते. यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.
केसांसाठी कोणते तेल चांगले?
रुबेन भसीन यांनी सांगितले की केसांसाठी कोणतेही तेल लावता येते, पण मोहरीचे तेल वारंवार लावण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण ते टाळूवर चिकटून राहतं. तज्ज्ञांच्या मते केसांसाठी नारळाचे तेल सर्वाधिक योग्य आहे. जर खोबऱ्याचं तेल थंडीत गोठत असेल तर बदामाचे तेल वापरावे. आजकाल लोक अधिक जागरूक झाले आहेत आणि कोणतेही तेल अति वापरण्याऐवजी केसांची योग्य काळजी घेण्याचा प्रयत्न करतात.
कोणत्या तेलाने केस गळणे बंद होते
डर्मेटोलॉजिस्ट यांच्या मते कोणतेही तेल लावल्याने केस गळणे थांबत नाही. केसांच्या आरोग्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण केसांनाही शरीराप्रमाणेच पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
Web Summary : No single oil stops hair fall. Oils nourish hair, but excessive use causes scalp issues. Diet and lifestyle are crucial for healthy hair. Use oil briefly before washing.
Web Summary : कोई भी एक तेल बालों का गिरना नहीं रोकता। तेल बालों को पोषण देते हैं, लेकिन अत्यधिक उपयोग से खोपड़ी की समस्या होती है। स्वस्थ बालों के लिए आहार और जीवनशैली महत्वपूर्ण हैं। धोने से पहले थोड़ी देर के लिए तेल का प्रयोग करें।