Lokmat Sakhi >Beauty > लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

Deepika Padukone's Hair Care & Styling : Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding : Natural Homemade Rosemary Spray : दीपिकाने सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्याकडून नैसर्गिक व पोषणयुक्त हेअर स्प्रे तयार करुन घेतला होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 12:34 IST2025-05-29T12:14:45+5:302025-05-29T12:34:07+5:30

Deepika Padukone's Hair Care & Styling : Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding : Natural Homemade Rosemary Spray : दीपिकाने सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्याकडून नैसर्गिक व पोषणयुक्त हेअर स्प्रे तयार करुन घेतला होता.

Deepika Padukone's Hair Care & Styling Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding Natural Homemade Rosemary Spray | लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

आपल्या लग्नात आपण खास दिसावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच आपले सौंदर्य आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. दीपिका (Deepika Padukone) नेहमीच आपला फिटनेस आणि हेल्थसोबतच आपल्या सौंदर्यची देखील तितकीच काळजी घेते. तिच्या लग्नाच्या खास दिवशी आपण सुंदर (Deepika Padukone's Hair Care & Styling) दिसावं यासाठी तिने फक्त आपला मेकअप आणि कपड्यांवरच लक्ष केंद्रित (Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding) न करता इतरही गोष्टींची विशेष काळजी घेतली होती लग्नासारख्या खास प्रसंगी सुंदर दिसावं यासाठी नुसताच आर्टिफिशियल मेकअपवर भर न देता तिने आपली त्वचा आणि केसांची (Natural Homemade Rosemary Spray) विशेष देखभाल ठेवली होती. केस सुंदर दिसावेत म्हणून तिने खास केसांसाठी कोणतेही आर्टिफिशियल उपचार न करता देसी आणि घरगुती उपाय करण्यावर अधिक जास्त भर दिला होता. 

दीपिकाने सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्याकडून एक नैसर्गिक आणि पोषणयुक्त हेअर स्प्रे खास बनवून घेतला होता. या स्प्रेच्या नियमित वापरामुळे तिच्या केसांना नैसर्गिक चमक, मजबूतपणा, आणि पोषण मिळाल्यामुळे, तिचे केस तिच्या लग्नासारख्या खास प्रसंगी अधिक जास्त घनदाट आणि सुंदर दिसत होते. न्यूट्रिशनिस्ट श्वेता यांनी खास दीपिकाच्या केसांसाठी तयार केलेला खास स्प्रे फक्त केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर केसांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायदेशीर होता. आपण देखील हा स्प्रे चक्क घरच्याघरीच तयार करू शकतो, तो कसा करायचा ते पाहूयात.  

साहित्य :- 

१. रोझमेरी - ३ टेबलस्पून 
२. मेथी दाणे - ३ टेबलस्पून 
३. काळीमिरी दाणे - ३ टेबलस्पून 
४. पाणी - ३०० मि. ली

जास्वंदीच्या पानाफुलांचा हेअर मास्क पावसाळ्यात करतो केसांवर जादू, कोरडे-राठ केस होतात मऊमऊ सुंदर...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये प्रत्येकी ३ टेबलस्पून रोझमेरी, मेथी दाणे, काळीमिरी दाणे एकत्रित घेऊन ते पॅनमध्ये कोरडे भाजून घ्यावेत. 
२. त्यानंतर या मिश्रणात ३०० मि. ली पाणी घालून हे सगळे मिश्रण हलके उकळवून घ्यावे. 
३. उकळवून झाल्यानंतर हे मिश्रण एक रात्र तसेच ठेवून द्यावे. पाण्यात सगळे जिन्नस एकत्रित भिजू द्यावेत. 
४. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून एका बाटलीत भरून घ्यावे. आपला हेअर स्प्रे केसांसाठी वापरायला तयार आहे. 

याचा वापर कसा करायचा ? 

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या न्यूट्रिशनिस्ट, श्वेता शहा यांच्या मते, फक्त ३ आठवडे सलग या स्प्रेचा वापर केसांवर केला तर आपल्याला त्यांचे झालेले अनेक चांगले फायदे केसांवर दिसतात. या हेअर स्प्रेच्या वापरामुळे केसगळती, डँड्रफ, स्काल्पला येणारी खाज, केसांची वाढ खुंटणे, रुक्ष - निस्तेज झालेले केस यांसारख्या समस्यांसाठी फायदेशीर ठरते. 

अजूनही त्वचेसाठी केमिकल्सयुक्त ब्लिच वापरताय?घरच्याघरी करा नॅचरल ब्लिच-त्वचा दिसेल तजेलदार!

अमोनियायुक्त हेअर कलर्सना म्हणा नाही! मेथी दाणे, हळद, अळशीचा नॅचरल हेअर कलर - केस दिसतील काळेभोर...

हा हेअर स्प्रे वापरण्याचे फायदे... 

१. रोझमेरी :- रोझमेरी केसगळती कमी करून केसांच्या वाढीस चालना देते, तसेच स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारण्यास मदत होते.

२. मेथी दाणे :- मेथी दाणे केसांवर नैसर्गिक कंडिशनरप्रमाणेच काम करतात, याचबरोबर केस मजबूत आणि चमकदार देखील होतात. 

३.  काळीमिरी दाणे :- केसांची खुंटलेली वाढ झटपट होण्यासाठी काळीमिरी दाणे अधिक फायदेशीर ठरतात.


Web Title: Deepika Padukone's Hair Care & Styling Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding Natural Homemade Rosemary Spray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.