lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > मोबाइलमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडताहेत, चेहऱ्याचं तारुण्य ओसरतंय, सावधान!

मोबाइलमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडताहेत, चेहऱ्याचं तारुण्य ओसरतंय, सावधान!

डिव्हाइसमधून परावर्तित होणारा ब्ल्यू लाइट पिग्मेण्टेशन , सुरकुत्या, एजिंग अशा सौंदर्य समस्यांना आमंत्रण देत आहे. या ब्ल्यू लाइटपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 05:54 PM2021-03-23T17:54:22+5:302021-03-24T16:48:41+5:30

डिव्हाइसमधून परावर्तित होणारा ब्ल्यू लाइट पिग्मेण्टेशन , सुरकुत्या, एजिंग अशा सौंदर्य समस्यांना आमंत्रण देत आहे. या ब्ल्यू लाइटपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं.

The darling mobile in hand is the main cause of aesthetic problems. How is that | मोबाइलमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडताहेत, चेहऱ्याचं तारुण्य ओसरतंय, सावधान!

मोबाइलमुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडताहेत, चेहऱ्याचं तारुण्य ओसरतंय, सावधान!

Highlightsडिव्हाइसच्या स्क्रीनमधून परावर्तित होणारा ब्लू लाइट त्वचेच्या आतपर्यंत जातो.ब्ल्यू लाइटचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे चेहेरा काळवंडतो. ब्ल्यू लाइटच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस महत्त्वाची ठरतात.

स्क्रीन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या स्क्रीनच्या प्रभावाखाली वावरत असतात. मोबाइल, कम्प्यूटर, टी.व्ही, लॅपटॉप अशा कोणत्या ना कोणत्या डिव्हाइसच्या संपर्कात आपण सतत असतो. त्यामुळे स्क्रीन टाइमची समस्या गंभीर होत आहे. या स्क्रीन टाइममुळे सौंदर्यविषयक समस्याही गंभीर झाल्या आहेत. डिव्हाइसमधल्या स्क्रीनमधून जो प्रकाश परावर्तित होत असतो त्याचा प्रभाव त्वचेवर होतो आणि त्यातून सौंदर्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. या प्रकाशाला HEVअर्थात हाय एनर्जी व्हिजीबल असं म्हणतात. त्यालाच ब्ल्यू लाइट असंही म्हणतात. सूर्यापासून परावर्तित होणाऱ्या  अती नील किरणांपेक्षाही हा डिव्हाइसच्या स्क्रीनमधून परावर्तित होणारा ब्लू लाइट त्वचेच्या आतपर्यंत जातो. या समस्येपासून वाचण्याचे , ती आटोक्यात ठेवण्याचे काही मार्ग आहेत

 

काय कराल?

- ब्ल्यू लाइटचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे चेहेरा काळवंडतो. हायपरपिग्मेंटेशनची समस्या तीव्र होते. ही समस्या अ‍ॅण्टि एचइव्ही सौंदर्य उत्पादनातून आटोक्यात येऊ शकते. आपण सनस्क्रीन वापरतो. पण प्रत्येक सनस्क्रीनमधे एचइव्ही पासून त्वचेचं संरक्षण करणारे घटक असतीलच असं नाही. त्यामूळे सनस्क्रीनमधे अ‍ॅण्टी एचइव्ही घटक आहेत का हे तपासून घ्यावं. कमीतकमी ३० एसपीएफ असलेलं सनस्क्रीन वापरावं.

- ब्ल्यू लाइट पासून सूरक्षा देणारी उत्पादनं विविध स्वरुपात उपल्ब्ध आहेत. क्रीम, तेल, सीरम अशा स्वरुपात ती मिळतात. उत्पादन कोणतंही असलं तरी चालेल पण त्यात त्वचेचं संरक्षण करणारे अ‍ॅण्टिऑक्सिडण्टचं प्रमाण हे महत्त्वाचं असतं. हे अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस त्वचेचं ब्ल्यू लाइट पासून सरंक्षण करतात. शिवाय ब्ल्यू लाइटमूळे त्वचेचं झालेलं नूकसानही भरुन काढतात. त्यासाठी टोमॅटो अर्क असलेले डे फेशिअल ऑइल वापरावं. चेहेरा धूतल्यानंतर दोन तीन थेंब हातावर घेऊन ते मसाज करत चेहेऱ्यास लावावं. या ऑइलमधील घटक ब्ल्यू लाइट त्वचेत शिरण्याआधीच तो शोषून त्वचेचं संरक्षण करतात. मेकअप करायचा असल्यास आधी तेल लावून त्यावर मेकअप करण्यापेक्षा मेकअपसाठी वारपल्या जाणाऱ्या फाऊंडेशन क्रीममधे या तेलाचे दोन तीन थेंब टाकल्यास त्याचा फायदा होतो.

- फोन हे डिव्हाइस अनेकजण आपल्या चेहेऱ्याच्या अगदी जवळ आणि समोर धरतात. त्यामूळे या फोनच्या स्क्रीनमधून परावर्तीत होणारा ब्ल्यू लाइट थेट चेहेऱ्यावर पडतो. त्यामूळे मोबाइलचा डिस्प्ले अ‍ॅडजेस्ट करावा. फोनच्या स्क्रीनमधून ब्ल्यू लाइट परावर्तित होऊ नये यासाठी नाइट मोड सिलेक्ट करावा. त्यातून ब्राइटनेस कमी होतो. फोनवरचं वाचताना डोळ्यांवर ताण येणार नाही इतपतच फोनचा ब्राइटनेस ठेवावा.

. या ब्ल्यू लाइटमुळे सूरकूत्या, एजिंगची समस्या निर्माण होते. म्हणूनच तुम्ही तो फोन कसा धरता, कूठे ठेवता हे महत्त्वाचं ठरतं. फोन हा मेसेज करतान किंवा फोनवरचं वाचताना थेट चेहेऱ्यासमोर न ठेवता चेहेऱ्याच्या खाली धरावा. मांडीवर ठेवावा. त्यामुळे ब्ल्यू लाइट थेट चेहेऱ्यावर पडत नाही.

Web Title: The darling mobile in hand is the main cause of aesthetic problems. How is that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.