Join us

हिप्सवर काळे डाग पडलेत, त्वचा ड्राय झाली, खाज सुटते? ३ उपाय, ड्रायनेस होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2023 17:15 IST

Dark spots on hips, dry skin, itching? 3 solutions, dryness will be reduced हिवाळ्यात त्वचेचे आजार बळावतात, तिकडे दुर्लक्ष करु नका.

त्वचेच्या निगडीत समस्या प्रत्येकाला असते. त्वचा चमकदार आणि ग्लोइंग बनवण्यासाठी आपण खटाटोप करतच असतो. स्किन जरी एकच असली तरी त्याच्या प्रत्येक भागातील पोत हा वेगळा असतो. आपण अधिक करून चेहरा, हात आणि पायावरील त्वचेकडे लक्ष देतो. यासह योनीवरील त्वचेची देखील काळजी घेतो. मात्र, हिप्सच्या त्वचेकडे आपले दुर्लक्ष होते.

हिप्सची त्वचा काळवंडते, त्यावर लहान पुरळ उठतात. यासह पिगमेंटेशनची समस्या देखील दिसून येते. काही लोकं हिप्सच्या एरियावरील स्किन साफ करण्यासाठी व्हाइटनिंग क्रीमचा वापर करतात. याचा वापर करून देखील तेथील स्कीन काळपट आणि ड्राय दिसू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेची स्वच्छता महत्वाची. यासह काही घरगुती उपाय आपल्या कामी येतील.

खोबरेल तेलापासून बनवा स्क्रब

खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेलापासून तयार स्क्रबचा वापर करून आपण नितंबांच्या मृत त्वचेच्या पेशी सहजपणे काढू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा खोबरेल तेल घ्या, त्यात एक चमचा साखर मिक्स करा. स्क्रब तयार झाल्यानंतर नितंबांवर लावा आणि त्वचेला काही वेळ हलक्या हातांनी घासून घ्या. दोन मिनिटांनंतर, नितंब स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. यासोबतच त्वचाही स्वच्छ आणि मुलायम होईल.

तुरटीचा करा असा वापर

तुरटीचा वापर केल्याने स्किनवरील मृत त्वचेवरील पेशी निघतात. यासाठी अंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात तुरटीचा छोटा भाग मिक्स करा. तुरटी पाण्यात विरघळल्यानंतर या पाण्याने आंघोळ करा. याचा नियमित वापर केल्याने नितंबांचा काळेपणा तर दूर होईलच पण बाकीची त्वचाही स्वच्छ आणि चमकदार दिसेल.

हळदने बनवा बॉडी वॉश

औषधी तत्वांनी समृद्ध असलेली हळद त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर करते. हिप्सवरील त्वचा साफ करण्यासाठी हळदपासून बॉडी वॉश तयार करा. यासाठी एका वाटीत एक चमचा बेसन, एक चमचा हळद, एक चमचा मोहरीचे तेल, व एक चमचा दुध टाकून मिश्रण चांगले मिक्स करा. हे मिश्रण  नितंबांवर लावा आणि काही वेळानंतर हिप्स स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे नितंबांची त्वचा स्वच्छ आणि मऊ होईल.

टॅग्स :त्वचेची काळजीहोम रेमेडी