Lokmat Sakhi >Beauty > मानेजवळ काळेकुट्ट थर? पाहा मान काळी होण्याची कारणं आणि ४ घरगुती उपाय

मानेजवळ काळेकुट्ट थर? पाहा मान काळी होण्याची कारणं आणि ४ घरगुती उपाय

Dark patches on the neck? See the causes of dark neck and 4 home remedies : मानेजवळील काळे डाग कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत. पाहा सोपे घरगुती उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 18:08 IST2025-06-06T18:08:03+5:302025-06-06T18:08:47+5:30

Dark patches on the neck? See the causes of dark neck and 4 home remedies : मानेजवळील काळे डाग कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत. पाहा सोपे घरगुती उपाय.

Dark patches on the neck? See the causes of dark neck and 4 home remedies | मानेजवळ काळेकुट्ट थर? पाहा मान काळी होण्याची कारणं आणि ४ घरगुती उपाय

मानेजवळ काळेकुट्ट थर? पाहा मान काळी होण्याची कारणं आणि ४ घरगुती उपाय

टॅनिंग ही अगदी कॉमन समस्या आहे. हात काळवंडतात. पायला टॅनिंग होते तसेच चेहर्‍यालाही टॅनिंग होते. विविध अवयवांचे अति उन्हामुळे टॅनिंग होते. तसेच मानेच्या जवळचा भागही काळा पडतो. (Dark patches on the neck? See the causes of dark neck and 4 home remedies)मात्र मान काळी होण्यामागे इतरही अनेक कारणे असतात. फक्त टॅनिंगमुळेच होते असे नाही. दिसायला ते फार वाईट दिसते. तसेच काही केसमध्ये खाजही सुटते. मानेभोवती काळ्या रंगाचा थर जमायला लागतो. काळ्या रेषा दिसायला लागतात आणि ते वाढतच जाते.  मान काळवंडण्यामागे काय कारणे असू शकतात ते जाणून घ्या.  कारण कळल्यावर उपायही लगेच करता येईल. 

सूर्यप्रकाशामुळे तर मान काळवंडतेच. मात्र मानेवरील मृत पेशींमुळेही मान काळी पडते. तसेच जर तुम्हाला भरपूर घाम येत असेल तर घामामुळेही मान काळी होऊ शकते. अंघोळ करणे, काही प्रॉडक्ट्स वापरणे या गोष्टी त्वचेची काळजी घेण्यासाठी गरजेच्या असतात. जर तुम्ही छान स्वच्छता राखत नसाल तरी त्वचेला त्रास होतो. जीवनशैली आणि सवयींमध्ये बदल करणे गरजेचे असते. तसेच काही घरगुती उपाय करता येतात. ते नक्की करुन पाहा. 

१. शरीराच्या विविध अवयवांचे टॅनिंग कमी करण्यासाठी बटाटा वापरणे अगदी फायद्याचे ठरते.  बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. बटाट्याचा रस मानेवर लावून १५ ते २० मिनिटे ठेवायचा नंतर पाण्याने धुवायचा. 

२. बेसन आणि लिंबाचा रस एकत्र करुन लावणे उपयुक्त ठरेल. मात्र नियमित काही दिवस लावा मगच फरक जाणवेल. चमचाभर बेसन आणि चमचाभर लिंबाचा रस मानेला लावायचा. थोडावेळ ठेवायचे आणि मग धुवायचे.

३. कोरफडीचा अर्क लावणे अगदीच फायद्याचे ठरते. कोरफड फक्त काळपटपणा कमी करत नाही तर थंडावापण देते. त्वचा मॉइश्चराइझ करण्यासाठी मदत होते.    

४. लिंबू आणि मधाचा लेप लावणे फायद्याचे ठरेल. त्वचा मॉइश्चराइझ होण्यासाठी या मास्कचा उपयोग होतो. मधामुळे त्वचा मऊसुद्धा होते. चमचाभर मध आणि चमचाभर लिंबाचा रस घ्यायचा. लेप लावल्यावर २० ते २५ मिनिटे ठेवायचा आणि मग धुवायचा. 

Web Title: Dark patches on the neck? See the causes of dark neck and 4 home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.