Lokmat Sakhi >Beauty > वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

Dark Circles Removal Remedy : Natural home remedies for removing dark circles : How To Get Rid of Dark Circles Permanently : Simple Home Remedies to Treat Dark Circles : How to remove dark circles under eyes permanently : डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल्स होतील चुटकीसरशी कमी, फक्त करुन पाहा हा खास नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 14:00 IST2025-04-28T13:45:44+5:302025-04-28T14:00:32+5:30

Dark Circles Removal Remedy : Natural home remedies for removing dark circles : How To Get Rid of Dark Circles Permanently : Simple Home Remedies to Treat Dark Circles : How to remove dark circles under eyes permanently : डोळ्यांखाली असलेले डार्क सर्कल्स होतील चुटकीसरशी कमी, फक्त करुन पाहा हा खास नैसर्गिक उपाय...

Dark Circles Removal Remedy How to remove dark circles under eyes permanently Simple Home Remedies to Treat Dark Circles How To Get Rid of Dark Circles Permanently | वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

वर्षानुवर्षे डोळ्यांखाली असणारे डार्क सर्कल्स होतील गायब, फक्त २ स्टेप्स - स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ असरदार...

डोळ्यांखाली येणारे गडद डार्क सर्कल्स ही समस्या अनेकजणींना सतावते. डोळ्यांखाली दिसणाऱ्या डार्क सर्कल्समुळे आपल्या डोळ्यांचे नैसर्गिक सौंदर्य हरवून जाते. काहीवेळा तर या डार्क सर्कल्समुळे (Dark Circles Removal Remedy) आपण कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. डार्क सर्कल्स घालवण्यासाठी आपण अनेक (Natural home remedies for removing dark circles) महागड्या क्रीम्स, लोशन आणि अनेक ब्यूटी ट्रिटमेंट्स करून घेतो. डोळ्यांखालील डार्क सर्कल्स (Simple Home Remedies to Treat Dark Circles) केवळ डोळ्यांचे सौंदर्यच बिघडवत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याचा लूकही खराब करतात. जर योग्य वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर ही काळ्या वर्तुळांची समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच तीव्र होते. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रिम्सचा वापर करण्याऐवजी आपण काही घरगुती नैसर्गिक उपाय करुन पाहू शकतो( How to remove dark circles under eyes permanently).

काहीवेळा डोळ्यांखालील डार्क सर्कल्स इतके जुनाट आणि हट्टी असतात की अनेक उपाय केले तरीही जायचं नावच घेत नाही. कालांतराने हे डार्क सर्कल्स अधिकच गडद होत जातात ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य पूर्णपणे हरवून जाते. काहीवेळा आपण हे डोळ्यांखालील गडद डार्क सर्कल्स मेकअपच्या मदतीने  लपवतो. परंतु असे किती दिवस आपण मेकअपच्या मदतीने डार्क सर्कल्स लपवणार, यावर काहीतरी ठोस आणि असरदार उपाय करणे आवश्यक असते. डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील काही खास पदार्थांचा मास्क करून डोळ्यांखाली लावू शकतो. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कितीही वर्षापूर्वीचे जुनाट असतील तरीही ते अगदी सहजपणे निघून जातील.  

डोळ्यांखाली डार्क सर्कल्स घालवण्यासाठी उपाय... 

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी shampabeauty.tips या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास घरगुती उपाय शेअर करण्यात आला आहे. या घरगुती उपायांमध्ये आपण आपल्या स्वयंपाक घरातीलच उपलब्ध पदार्थांच्या मदतीने हे डार्क सर्कल्स अगदी सहजपणे काढू शकतो. हा उपाय अगदी घरगुती आणि स्वयंपाक घरातीलच पदार्थ वापरुन करायचा असल्याने आपल्याला फारसा खर्च देखील करावा लागणार नाही. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा... 

दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...

हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला बटाटा, हळद, बेसन, लिंबाचा रस, कॉफी पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. या साहित्याच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील डार्क सर्कल्ससाठी खास आयमास्क तयार करू शकता. 


 
डोळ्यांसाठी आयमास्क तयार करण्याच्या २ स्टेप्स आहेत. यात पहिल्या स्टेपमध्ये कच्चा बटाटा किसून घ्यावा. या कच्च्या किसलेल्या बटाट्याचा एक गोलाकार थर तयार करून तो डोळ्यांवर १० ते १५ मिनिटे तसाच ठेवून द्यावा. 

तुम्हांला लांब केस चांगले दिसतील की शॉर्ट, कसे ओळखालं ? करून पाहा ही भन्नाट ट्रिक - मिळेल परफेक्ट लूक...

त्यानंतर हा कच्चा बटाट्याचा किस डोळ्यांवरून काढून डोळे पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यावेत. मग दुसऱ्या स्टेपमध्ये, एका बाऊलमध्ये कच्च्या बटाट्याचा रस, हळद, बेसन, लिंबाचा रस, कॉफी पावडर घालून मास्क तयार करून घ्यावा. या तयार मास्क मध्ये कॉटन पॅड्स भिजवून ते कॉटन पॅड्स डोळ्यांखाली ठेवून २० मिनिटे ते तसेच राहू द्यावेत. त्यानंतर, डोळे स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय जर तुम्ही अगदी दररोज केला तर महिनाभरात डोळ्यांखालील डार्क सर्कल्स अगदी सहजपणे नैसर्गिक पद्धतीने कमी होतील.


Web Title: Dark Circles Removal Remedy How to remove dark circles under eyes permanently Simple Home Remedies to Treat Dark Circles How To Get Rid of Dark Circles Permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.