चेहऱ्यावर सुरकुत्या, डार्क सर्कल येऊ लागले की आपल्याला टेन्शन येते. ऋतू कोणताही असला तरी हा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. (Flaxseed Face Pack for Dark Circles) चेहरा कोरडा होणे, तेलकट किंवा निस्तेज यांसारख्या समस्या देखील उद्भवतात.(Wrinkle-Reducing Flaxseed Gel) चेहरा अधिक सुंदर आणि चमकण्यासाठी आपण त्यावर अनेक महागडे केमिकल्स असणारे क्रीम आणि उत्पादने वापरतो. परंतु, यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमे येऊ लागतात. (Ayurvedic Face Mask for Youthful Skin)
त्वचेला योग्य प्रकारे मॉइश्चरायझर मिळवा यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. त्वचेची जितकी काळजी आपण घेतो त्याप्रमाणे आहार देखील आरोग्यदायी असायला हवा.(Get Rid of Tanning Naturally at Home) बरेचदा आपण ऐकलं असेल अळशीच्या बिया खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो.(Best Home Remedy for Under Eye Wrinkles) यामध्ये ओमेगा- ३ फॅटी अॅसिड असते. जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते. तसेच याचे तेल त्वचेसाठी चांगले असते. ज्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार बनते. यामुळे त्वचा हायड्रेट होते. त्वचेवरील लालसरपणा, खाज आणि रॅशेस कमी करण्यास मदत करतात. त्वचेची लवचिकता वाढवण्यासह सुरकुत्या कमी करण्याचे काम अळशी करते. (Natural Skin Care for Glowing Skin)
उन्हामुळे टाचांच्या भेगा खूप वाढल्या, चालताना दुखते ? १ सोपा घरगुती उपाय, टाचा होतील मऊ आणि बऱ्या
आपल्या त्वचेवर अगदी कमी वयात सुरकुत्या किंवा डार्क सर्कल येत असतील तर वेळीच काळजी घ्यायला हवी. ब्लॅकहेड्स आणि चेहऱ्यावरील डागामुळे वैतागले असाल तर अळशीचा फेसपॅक फायदेशीर ठरेल. यात असणारे घटक त्वचेची लवचिकता वाढवतात, त्वचेवर तयार झालेल्या जखमा भरुन काढतात. त्वचेला सॉफ्ट आणि चमकदार बनवतात. आपल्या डोळ्याखाली काळे वर्तुळ आले असेल तर फेसपॅक ट्राय करुन बघा.
हा फेसपॅक तयार करण्यासाठी अळशीच्या बियांचा पावडर तयार करा. त्यानंतर ३ चमचे कोरफड जेल, व्हिटॅमिन इ कॅपसुल आणि अळशीच्या बियांचा पावडर घालून जेल तयार करा. हा जेल चेहऱ्यावर रोज ३० मिनिटे ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचेवर आलेले टॅनिंग आणि पिंपल्सही निघून जाण्यास मदत होईल.