बदलेल्या जीवनशैलीमुळे कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. (Dark circles Ayurvedic remedy) ज्याचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतोय. रात्री उशिरापर्यंत काम करणे, दिवसभर स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे यांसारख्या इतर कारणांमुळे आपल्याला डार्क सर्कलची समस्या सतावते. (Homemade under eye cream)
कमी वयातच डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा शरीरात पोषक तत्वांचा अभाव, अनुवांशिक समस्या आणि हार्मोनल बदलांमुळे काळ्या वर्तुळांच्या समस्येचा भेडसावतात.(How to reduce dark circles naturally) डार्क सर्कल्स चेहऱ्यांच्या सौंदर्यावर परिणाम करतात. ज्यामुळे आपण आजारी दिसू लागतो. ज्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते. (Mulethi powder for skin)
ऐन तारुण्यात केस पांढरे व्हायला लागले? हेअर कलर नकोच, करा ५ आयुर्वेदिक उपाय-काळेभोर होतील केस
डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो. परंतु, काही केल्या डोळ्यांच्या खाली असणारे काळे वर्तुळ कमी होत नाही. काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर नक्की फायदा होऊ शकतो. यासाठी आपण काही आयुर्वेदिक घटकांचा वापर करायला हवा. जायफळ आणि ज्येष्ठमध हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. जायफळ आणि ज्येष्ठमध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हे आपल्या त्वचेला घट्ट करुन डाग कमी करते तसेच त्वचेला चमकदार बनवते. डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण जायफळ आणि ज्येष्ठमधाचा कसा वापर करायचा पाहूया.
सगळ्यात आधी जायफळ आणि दूध घेऊन ते घासून घ्या. त्यानंतर ज्येष्ठमधाचा पावडर घालून त्याची जाडसर पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी क्लींजर किंवा फेसवॉश चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर बोटावर तयार केलेली क्रीम घेऊन डोळ्यांभोवती मसाज करा. १० मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे त्वचेची काळजी घेतल्याने काही दिवसांत काळी वर्तुळे निघून जाण्यास मदत होईल.