Join us
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपयांचा कढीपत्ता विकत आणून घरी करा केसांसाठी ‘हे’ टॉनिक, केस होतील दाट-सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:04 IST

Curry Leaves For Hair Growth : तुमचेही केस व्यवस्थित वाढत नसतील कायम गळत असतील तर तुम्ही कढीपत्त्याचा १ सोपा उपाय करून केसांना लांबसडक आणि दाट बनवू शकता.

केस वाढवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात पण तरीही केस वाढत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. केस वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, कंडीशनर्स वापरतात पण त्याचा परिणाम तात्पुरताच दिसून येतो. (Curry Leaves Home Remedy For Hair Growth)

तुमचेही केस व्यवस्थित वाढत नसतील कायम गळत असतील तर तुम्ही कढीपत्त्याचा १ सोपा उपाय करून केसांना लांबसडक आणि दाट बनवू शकता. कढीपत्त्याचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही केसांसाठी एक नैसर्गिक उपाय तयार करू शकता. ( How To Grow Hairs Using Curry Leaves)

बाजारात मिळणारी केसांची उत्पादनं वापरून इतका फायदा होत नाही. कारण यात केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. केमिकल्स केसांना सूट करत नाहीत. ज्यामुळे केसांचं अधिकच नुकसान होतं. योग गुरू कैलास बिश्नोई यांनी कढीपत्ता  सुकवून हा उपाय कसा करावा याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Curry Leaves For Hair Growth)

केसांसाठी कढीपत्ता फायदेशीर 

 कढीपत्ता केसांसाठी फायदेशीर ठरतो कारण यात बीटा कॅरोटीन, एंटी ऑक्सिडेंट्स, आयर्न आणि अन्य पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात आणि केस गळणंही थांबते. याशिवाय  कढीपत्ता स्काल्पला पोषण देतो आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे केस दाट होतात आणि वेळेआधीच पांढरे होत नाहीत. 

केसांच्या मजबूतीसाठी हा उपाय कसा करावा?

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला १ चमचा तांदूळ, १ चमचा आळशीच्या बीया, १० ते १५ कढीपत्त्याची पानं, २-३ लवंग आणि तुमच्या केसांना सुट होणारा शॅम्पू हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करा. गरम पाण्यात १ चमचा तांदूळ आणि अळशीच्या बीया घाला. यात १० ते १५ कढीपत्त्याची पानं आणि काही लवंग घाला. सर्व पदार्थ ५ मिनिटं उकळवून घ्या. थंड झाल्यावर हे द्रावण गाळून घ्या. आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय केल्यास केसांची चांगली वाढ होईल आणि केस लांबसडक-दाट होण्यासही मदत होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Curry leaves tonic for thick hair: A simple home remedy.

Web Summary : Struggling with hair growth? Curry leaves, rich in nutrients, can strengthen hair from the roots. Boil curry leaves with rice, flax seeds, cloves, and shampoo for a natural hair tonic.
टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स