उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, घामासोबतच त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. त्यातही डोळ्यांखालील नाजूक त्वचेसंबंधित अनेक समस्या आपल्यापैकी अनेकींना सतावतात. कडक ऊन आणि घामामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडणे किंवा डोळे सुजल्यासारखे दिसणे या समस्या फारच कॉमन आहेत. एकंदरीतच, त्वचेचा तजेला कमी होतो आणि व्यक्तिमत्त्वही थकल्यासारखे वाटते. चेहऱ्यावर कितीही ग्लो असला, तरी डोळ्यांखालील काळे डाग संपूर्ण लूक खराब करतात. अशा परिस्थितीत, स्वयंपाकघरातील एक साधी हिरवीगार काकडी तुमच्या थकलेल्या डोळ्यांसाठी आणि डोळ्यांखालच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरु शकते(cucumber eye mask for dark circles).
काकडीमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म आणि मुबलक प्रमाणांत पाणी असते, जे डोळ्यांखालील डार्क पॅचेस हलके करण्यास आणि थकलेल्या डोळ्यांना ताजेतवाने करण्यास मदत करतात. काकडीमध्ये असलेले कूलिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्म डोळ्यांना ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. काकडीच्या रसापासून तयार केलेला आय मास्क डार्क सर्कल्स कमी करण्यास, त्वचेला आराम देण्यास आणि डोळ्यांभोवतीची त्वचा सुंदर व फ्रेश दिसण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. काकडीच्या रसाचा आय मास्क (how to use cucumber for under eye dark circles) घरच्याघरीच कसा तयार करायचा, तो वापरण्याची योग्य पद्धत (cucumber for puffy eyes and dark circles) आणि त्याचे डोळ्यांच्या सौंदर्यासाठी होणारे आश्चर्यकारक फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात...
हिरव्यागार काकडीच्या रसाचा घरगुती आय मास्क...
डोळे आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हिरव्यागार काकडीच्या रसाचा घरगुती आय मास्क करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ टेबलस्पून काकडीचा रस, २ ते ३ थेंब व्हिटॅमिन 'ई' ऑईल आणि ६ ते ८ कॉटन पॅड्स आणि एक मध्यम आकाराचा काचेचा कंटेनर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
नेमकं करायचं काय ?
सगळ्यात आधी हिरवीगार काकडी किसणीच्या मदतीने एकदम बारीक किस होईल अशी किसून घ्या. त्यानंतर हा काकडीचा किस हातात घेऊन हलकेच दाब देत त्याचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. मग या काकडीच्या रसात व्हिटॅमिन 'ई' ऑईल काही थेंब घालावेत. एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये हे काकडी व व्हिटॅमिन 'ई' ऑईलचे मिश्रण ओतल्यावर त्यात कॉटन पॅड्स संपूर्णपणे भिजतील असे भिजवून घ्यावेत वरून झाकण लावून कंटेनर बंद करून घ्यावं.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...
याचा वापर कसा करावा ?
तयार केलेला काचेचा कंटेनर (ज्यात कॉटन पॅड्स रसात भिजवलेले आहेत) किमान १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. उन्हाळ्यात थंडगार आय मास्क वापरल्याने डोळ्यांना अधिक थंडावा मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते. काकडीच्या रसात पूर्णपणे भिजलेले दोन कॉटन पॅड्स घ्या आणि ते हलकेच पिळून जास्तीचा रस काढून टाका. आता हे पॅड्स तुमच्या दोन्ही बंद डोळ्यांवर आणि डोळ्यांखालील डार्क पॅचेसवर अशा पद्धतीने ठेवा की डोळ्यांखालील डार्क सर्कल्सचा भाग पूर्णपणे झाकला जाईल. हे पॅड्स लावून शांतपणे झोपा. साधारण १५ ते २० मिनिटे हे पॅड्स डोळ्यांवरच राहू द्या. २० मिनिटांनंतर पॅड्स काढून टाका.
महागड्या साडीवर पडलेला डाग काढण्याची भन्नाट युक्ती, ड्रायक्लिनिंगची गरज नाही-१ पैशाचा खर्च नाही...
डोळ्यांभोवती जो थोडाफार रस शिल्लक असेल, त्यावरून आपल्या बोटाने अगदी हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. यामुळे व्हिटॅमिन 'ई' ऑईल त्वचेत खोलवर मुरेल. शेवटी, चेहरा साध्या किंवा थंड पाण्याने धुवून घ्या आणि मऊ टॉवेलने कोरडा करा. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा. हा काकडीचा रस तुम्ही फ्रिजमध्ये २ ते ३ दिवस स्टोअर करू शकता, त्यापेक्षा जास्त दिवस जुना रस वापरू नका. जर तुमच्याकडे कॉटन पॅड्स नसतील, तर तुम्ही साध्या कापसाचे बोळे किंवा मऊ सुती कापडाच्या घड्या देखील वापरू शकता.
या घरगुती आय मास्कचे फायदे...
१. काकडीतील ब्लिचिंग गुणधर्म आणि व्हिटॅमिन 'ई' मुळे डोळ्यांखालील काळेपणा हळूहळू कमी होतो.
२. सकाळी उठल्यावर जर डोळे सुजलेले दिसत असतील, तर हा थंडगार मास्क सूज झटकन कमी करतो.
३. उन्हाळ्यातील डोळ्यांची जळजळ थांबवून डोळ्यांना नैसर्गिक ओलावा मिळतो.
४. व्हिटॅमिन 'ई' मुळे डोळ्यांभोवतीची त्वचा टाईट राहते आणि फाईन लाईन्स कमी होतात.
Web Summary : Combat dark circles with a cooling cucumber eye mask. Blend cucumber juice, vitamin E oil, and cotton pads. Apply chilled pads to eyes for 15-20 minutes, 3-4 times weekly, for brighter, refreshed skin.
Web Summary : ठंडी खीरे के आई मास्क से काले घेरों से मुकाबला करें। खीरे का रस, विटामिन ई तेल और कॉटन पैड मिलाएं। चमकदार, ताज़ा त्वचा के लिए 15-20 मिनट के लिए, सप्ताह में 3-4 बार आंखों पर ठंडे पैड लगाएं।