Join us

चमचाभर खोबरेल तेल, २ मेणबत्त्या वापरुन करा पायांच्या भेगांवर असरदार उपाय - भेगाळलेल्या टाचाही होतील मऊमुलायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2025 17:03 IST

Cracked Heels Home Remedy : How to heal cracked heels in winters : थंडीच्या दिवसांत पायांना भेगा पडण्याचा त्रास होऊ नये यासाठीच हा भन्नाट उपाय...

वातावरणातील वाढत्या थंडीचा थेट परिणाम आपल्या टाचांवर दिसून येतो. थंडीत त्वचा कोरडी पडणे, त्वचेला भेगा - सुरकुत्या पडणे अशा समस्या होणे अगदी कॉमन आहे. परंतु आपण हिवाळ्यात पायाच्या टाचांकडे अजिबात लक्ष न देता आपल्या संपूर्ण त्वचेची विशेष काळजी घेतो. थंडीत पायांच्या तळव्याला भेगा पडून पाय दुखणे, इन्फेक्शनचा त्रास सतावू शकतो. विशेषतः जर पायाच्या भेगांमुळे त्यात माती अडकून राहते व संसर्ग वाढण्याचा धोका असतो. यामुळेच थंडीत अनेकांकडून पाय दुखत असल्याची तक्रार करतात (Wax For Cracked Heels - Easy Home Remedy).

कधी कधी भेगा पडलेल्या टाचांमधून खूप वेदना होतात. गंभीर अवस्थेतून त्यातून रक्तही बाहेर पडू लागते, काहीवेळा तर पाय जमिनीवर टेकवणंही कठीण होते. हिवाळ्यात पायांना भेगा (Candle Wax For Cracked Heels) पडण्याची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते, असे बहुतांश वेळा (How to heal cracked heels in winters) दिसून आले आहे. थंडीच्या दिवसांत पायांना भेगा पडण्याचा त्रास खूप जणांना होतोच, मात्र त्याची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते. यासाठीच आपण या भेगा कमी करण्यासाठी एका खास घरगुती उपायाचा वापर नक्की करू शकतो (Remove Cracked Heels By Using Candle Wax). बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या 'क्रॅक हील क्रीम्स' वापरूनही अनेकदा हवा तसा परिणाम मिळत नाही. पण, ही पायांच्या भेगांची समस्या कमी  करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या एका साध्या मेणबत्तीचा उपयोग करून आपण एक नैसर्गिक आणि अत्यंत स्वस्तात मस्त क्रीम तयार करू शकता. हिवाळ्यात टाचांवर पडणाऱ्या भेगा कमी करण्यासाठी घरगुती क्रीम कशी तयार करायची ते पाहा... 

हिवाळ्यात टाचांवर पडणाऱ्या भेगा कमी करण्यासाठी घरगुती क्रीम... 

हिवाळ्यात टाचांवर पडणाऱ्या भेगा कमी करण्यासाठी घरगुती क्रीम तयार करण्यासाठी आपल्याला, खोबरेल तेल १/२ कप, २ मेणबत्त्या, ग्लिसरीन १.५ टेबलस्पून, व्हिटॅमिन 'ई' च्या २ कॅप्सूल, १ टेबलस्पून एलोवेरा जेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे, यापैकी बरेचसे साहित्य आपल्या घरात कायम उपलब्ध असतेच. 

मलायका अरोरा- अनुष्का शर्मा वापरतात ‘हा’ होममेड फेसपॅक, हिवाळयात ड्राय स्किनचे सगळे प्रॉब्लम राहतात लांब...

पायांच्या भेगा घालवण्यासाठी क्रीम कशी तयार करावी ? 

सगळ्यांत आधी एका भांड्यात थोडं खोबरेल तेल ओतून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात २ मेणबत्तीचे बारीक तुकडे करून घालावे. मग मंद आचेवर हे मिश्रण चमच्याने हलवत गरम करून घ्यावे. मेणबत्तीचे तुकडे संपूर्णपणे वितळून होईपर्यंत मिश्रण मंद आचेवर गरम करत राहावे. मेणबत्तीचे तुकडे संपूर्णपणे वितळ्यावर गॅस बंद करून या मिश्रणात ग्लिसरीन, व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल, एलोवेरा जेल घालून मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रण एका डबीत भरुन व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे. मिश्रण जसजसे थंड होईल तसे ते अधिक घट्ट व दाटसर होईल, अशा प्रकारे हिवाळ्यात पायांवर पडणाऱ्या भेगा कमी करण्यासाठीची घरगुती क्रीम वापरण्यासाठी तयार आहे. 

मेहेंदी भिजवताना त्यात घाला ५ रुपयांची ही छोटीशी गोष्ट, केसांना सुंदर बर्गंडी-लाल रंग मिळेल महागड्या पार्लरसारखा...

या क्रीमचा वापर कसा करावा ?

तळपायाला किंवा फुटलेल्या टाचांवर ही क्रिम लावण्याधी पाय स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करून घ्यावे. मग ही क्रीम घेऊन थेट तळपाय किंवा टाचांच्या भेगांवर लावून हलकेच हाताने चोळून मसाज करून घ्यावा. मग पायात सॉक्स घालून झोपावे. दुसऱ्या दिवशी तुम्हांला तुमच्या पायांच्या टाचांमध्ये अधिक चांगला फरक जाणवू लागेल. आठवड्यातून किमान २ वेळा तरी हा उपाय करावा. यामुळे हिवाळ्यात पायांना फुटलेल्या टाचा पुन्हा पहिल्यासारख्या दिसू लागतील. अशाप्रकारे आपण पायांच्या टाचांना भेगा पडू नये म्हणून हा घरगुती सोपा उपाय करू शकता. 

यासोबतच आपण इतरही उपाय करू शकता...

१. पाय २० मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवा. २. ऑईल बेस्ड पेट्रोलियम जेलीचा वापर करा. ३. रात्री झोपताना पायांत मोजे घाला. ४. अनवाणी पाय जमिनीवर टेकवू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Effective home remedy for cracked heels using coconut oil & candles.

Web Summary : Combat cracked heels with a simple homemade cream. Melt coconut oil and candle wax, then mix in glycerin, vitamin E, and aloe vera. Apply nightly for soft, healed heels.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीथंडीत त्वचेची काळजी