Join us
Daily Top 2Weekly Top 5

भेगाळलेल्या टाचांवर स्वयंपाक घरातील ३ पदार्थ असरदार! रोज करा मालिश - टाचा होतील मऊ - मुलायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2025 18:47 IST

Cracked Heels Home Remedies : cracked heel treatment at home : dry cracked heels remedy : natural remedies for cracked heels : हिवाळ्यात पायांच्या टाचा फुटून भेगाळलेल्या असतील तर त्यावर घरगुती उपाय म्हणून नेमकं काय करू शकतो ते पाहा...

थंडीची चाहूल लागताच त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात आणि यापैकीच एक त्रासदायक समस्या म्हणजे टाचा फुटणे. विशेषतः हिवाळ्यात, थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, ज्यामुळे टाचांची त्वचा कोरडी पडून तडकू लागते. अनेकदा ही समस्या इतकी वाढते की टाचांना भेगा पडून त्यातून रक्तही येऊ शकते, ज्यामुळे चालताना असह्य वेदना होतात. टाचा फुटणे हा फक्त सौंदर्याचा प्रश्न नसून, ही एक आरोग्याची समस्या आहे जी आपल्या डेली रुटीनवर परिणाम करू शकते(Cracked Heels Home Remedies).

पायांच्या टाचा भेगाळलेल्या असल्या की, त्यावर उपाय म्हणून आपण वेगवेगळ्या क्रीम्स, लोशन चोपडून लावतो  परंतु याचसोबत काही नैसर्गिक उपाय देखील फायदेशीर ठरतात. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक नैसर्गिक पदार्थ आणि घरगुती उपाय आहेत, जे फुटलेल्या टाचांना मऊ, मुलायम आणि निरोगी करण्यास मदत करू शकतात. हिवाळ्यात थंड, कोरडं हवामान, पाणी कमी पिणं आणि टाचांकडे दुर्लक्ष यामुळे ही समस्या अधिकच वाढते. पण प्रत्येक वेळी महागडी क्रीम्स किंवा ट्रीटमेंट्सची गरजच (natural remedies for cracked heels) असतेच असं नाही. हिवाळ्यात पायांच्या टाचा फुटून भेगाळलेल्या असतील तर त्यावर घरगुती उपाय म्हणून नेमकं काय काय करू शकतो ते पाहूयात... 

हिवाळ्यात भेगाळलेल्या टाचांवर घरगुती उपाय... 

१. बटाटा :- फुटलेल्या टाचांवर घरगुती उपाय म्हणून बटाटा वापरणे फायदेशीर ठरते. सर्वातआधी एक बटाटा घ्या आणि तो मधोमध कापून घ्या. आता या कापलेल्या अर्ध्या बटाट्यावर बरोबर मधोमध सुरीच्या मदतीने हळूवारपणे ओरखडे मारा. या ओरखडे मारलेल्या भागावर हळद, टूथपेस्ट आणि खोबरेल तेल प्रत्येकी एक - एक चमचा घालून घ्या. यानंतर, हा बटाटा नियमितपणे तुमच्या फुटलेल्या टाचांवर चांगल्या प्रकारे घासा. यामुळे तुम्हाला काहीच दिवसांत फायदा दिसून येईल. या उपायामुळे तुमच्या टाचांची त्वचा मुलायम होईल आणि टाचांच्या भेगा कमी झालेल्या दिसतील. 

२. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी :- फुटलेल्या टाचांना मुलायम करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचा देखील वापर करू शकता. ग्लिसरीन त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि गुलाबपाणी त्वचेला थंडावा देण्यास फायदेशीर ठरते. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी सम प्रमाणात मिसळा आणि त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर लावून हलकेच हाताने मालिश करा. यामुळे काहीच दिवसांत नक्कीच फायदा दिसून येईल.

३. लिंबू आणि मध :- लिंबू आणि मधामध्ये अनेक असे गुणधर्म असतात, जे त्वचेला बरे करून तिला मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यास मदत करतात. फुटलेल्या टाचांसाठी, एका बाऊलमध्ये लिंबू आणि मध दोन्ही पदार्थ एकत्रित मिसळा आणि १५ मिनिटांसाठी टाचेवर तसेच लावून ठेवा. हा उपाय अगदी दररोज केल्यास त्वचेवरील डेड स्किन निघून जातील आणि फुटलेल्या टाचा मऊ - मुलायम होतील.

४. साजूक तूप आणि हळद :- फुटलेल्या टाचांवर आपण साजूक तूप आणि हळदीचे मिश्रण देखील लावू शकता. हे मिश्रण त्वचेला चमकदार आणि मऊ मुलायम बनविण्यात मदत करते. त्याचबरोबर, हळदीमध्ये ॲंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे त्वचेला जीवाणू आणि संसर्गापासून वाचवतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kitchen ingredients effectively heal cracked heels; massage daily for soft skin.

Web Summary : Dry winter air causes cracked heels. Kitchen remedies like potato, glycerin-rosewater, lemon-honey, and ghee-turmeric mixtures can soften and heal them. Regular application provides relief.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीथंडीत त्वचेची काळजीत्वचेची काळजी