भेगाळलेल्या किंवा टाचांवर चिरा पडल्या असतील तर अशा टाचा खूपच वेदना देतात. टाचांवर भेगा पडल्यास ते केवळ दिसायला खराब दिसत नाहीत, तर आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक ठरू शकते. जेव्हा टाचांची त्वचा आर्द्रता गमावते, तेव्हा टाचांवर भेगा पडू लागतात. भेगाळलेल्या टाचा ही केवळ सौंदर्याची समस्या नाही, तर ती वेदना, जळजळ आणि चालताना त्रास देणारी गंभीर समस्या ठरू शकते. सतत उघडे पाय ठेवणे, योग्य मॉइश्चरायझिंगचा वापर न करणे, कोरडी त्वचा, पाण्याचा जास्त संपर्क किंवा शरीरातील काही पोषणतत्त्वांची कमतरता यामुळे पायांच्या टाचांना खोल भेगा पडतात(how to heal cracked heels naturally).
अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे या भेगांतून रक्तस्राव होण्याचीही शक्यता असते. इतकंच नाही तर काहीवेळा या भेगा इतक्या खोल जातात की, चालताना असह्य वेदना होणे असे प्रकार घडतात. टाचांवर भेगा पडल्या की, त्या कमी होण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. भेगाळलेल्या टाचांवरील चिरा (how to soften hard heels naturally) काही केल्या लवकर भरुन येत नाही परिणामी आपण सतत काही ना काही वेगवेगळे उपाय करतो. टाचांच्या भेगा मुळापासून घालवण्यासाठी आणि त्वचा मऊमुलायम करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. रोजच्या वापरातील काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आपल्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक पदार्थांच्या (best home remedy for cracked heels overnight) मदतीने भेगाळलेल्या टाचा पुन्हा पाहिल्यासारख्याच मऊमुलायम करण्यासाठी घरगुती उपाय नेमका काय आहे ते पाहूयात.
भेगाळलेल्या टाचा मऊमुलायम करण्यासाठी घरगुती उपाय...
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या मते, जर तुम्ही अनेक उपाय करूनही तुमच्या भेगाळलेल्या टाचांची समस्या कमी होत नसेल, तर हा घरगुती आयुर्वेदिक नुस्खा रामबाण ठरू शकतो. विशेष म्हणजे या उपायासाठी कोणत्याही हानिकारक केमिकल्सची गरज नाही. डॉ. मनोज यांनी पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून हा उपाय सांगितला आहे.भेगाळलेल्या टाचा पुन्हा पहिल्यासारख्याच मऊमुलायम करण्यासाठी, २ टेबलस्पून एरंडेल तेल, २ टेबलस्पून मोहरीचे तेल, १ टेबलस्पून ग्लिसरीन आणि १ तांब्याची वाटी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
कतरिना-दीपिका सारखी कर्वी फिगर हवी ? हिरोईनसारख्या किलर फिगरसाठी १० टिप्स - दिसा फिट आणि सुंदर...
टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी नेमका उपाय काय ?
टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी सर्वातआधी, एका बाऊलमध्ये एरंडेल तेल आणि मोहरीचे तेल समप्रमाणात एकत्र करा. या तेलाच्या मिश्रणात थोडे ग्लिसरीन घाला आणि हे संपूर्ण द्रावण व्यवस्थित एकजीव करून घ्या. तयार झालेले हे मिश्रण भेगाळलेल्या टाचांवर आणि पायांच्या तळव्यांना व्यवस्थित लावा. आता काशाची वाटी (Copper Bowl) म्हणजेच तांब्याची वाटी घ्या आणि त्या वाटीने पायांच्या तळव्यांना हलक्या हाताने मसाज करा. (आयुर्वेदानुसार काशाच्या वाटीने मसाज केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते). मसाज झाल्यानंतर पायात मोजे घालून तसेच झोपा.
हा घरगुती उपाय करण्याचे फायदे...
१. एरंडेल तेल, ग्लिसरीन आणि मोहरीचे तेल यांचे मिश्रण त्वचेला आवश्यक असलेले पोषण आणि आर्द्रता पुरवते, ज्यामुळे कोरडी पडलेली त्वचा पुन्हा मऊमुलायम होते.
२. काशाच्या वाटीने (तांब्याच्या मिश्रधातूने) पायांच्या तळव्यांना हलक्या हाताने मसाज केल्यामुळे त्वचेतील टॉक्सिन्स (विषारी घटक) बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
३. जर आपण दररोज नियमितपणे हा उपाय फॉलो केला, तर टाचांच्या खोलवर गेलेल्या भेगा हळूहळू भरून निघतात आणि पाय सुंदर दिसू लागतात.
Web Summary : Cracked heels cause pain and discomfort. A home remedy using castor oil, mustard oil, glycerin, and a copper bowl massage can heal cracks and soften skin. Regular use provides moisture, improves circulation, and repairs deep fissures for beautiful feet.
Web Summary : फटी एड़ियां दर्द और परेशानी का कारण बनती हैं। अरंडी का तेल, सरसों का तेल, ग्लिसरीन और कांसे की कटोरी से मसाज करने से दरारें ठीक हो सकती हैं और त्वचा मुलायम हो सकती है। नियमित उपयोग नमी प्रदान करता है, परिसंचरण में सुधार करता है और सुंदर पैरों के लिए गहरी दरारों की मरम्मत करता है।