Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाय लावणं सोडा! आता १० रूपयांच्या गुलाबानं काळेभोर होतील पांढरे झालेले केस; रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 20:20 IST

Roses Can Turn Your Grey Hairs Into Black Hairs : या पद्धतीनं गुलाबातून निघालेले एक्सोसोम स्काल्पमध्ये इंजेक्ट केले जातात जेणेकरून मेलानोसाईड्स पुन्हा सक्रिय केले जाईल.

गुलाबाचं फुल फक्त सजावटीसाठी आणि सौंदर्य उत्पादनांमध्येच नाही तर इतर वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जाते. अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार गुलाबाच्या रोपामधून निघालेल्या स्टेम सेल्स टेक्निक केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग देण्यास मदत होते. हे संशोधन अशा लाखो लोकांसाठी गुणकारी आहे ज्यांना कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (Roses Garden Reverse Grey Hair Ageing Science)

डेली मेलच्या रिपोर्टनुसार डॅमस्क रोज नावाच्या गुलाबाचे स्टेम सेल काढले जातात. हे स्टेम सेल रोपांच्या मुळातून आणि पानांतून घेतले जातात. स्टेम सेलला मास्टर सेल असंही म्हणतात. कारण यात शरीरातील वेगेवगळ्या प्रकारच्या पेशी बदलण्याची क्षमता असते. वैज्ञानिक या स्टेम सेलला खास केमिकल्समध्ये मिसळतात ज्यामुळे एक्सोसोम नावाचे सुक्ष्मकण सोडतात. (Ref)

 एक्सोसोम एक नॅनो साईट फॅट बबल्स असतात. ज्यात जेनेटीक मटेरिअल आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराच्या खराब आणि निष्क्रीय पेशींची दुरूस्ती करण्यास मदत होते. या पद्धतीनं गुलाबातून निघालेले एक्सोसोम स्काल्पमध्ये इंजेक्ट केले जातात जेणेकरून मेलानोसाईड्स पुन्हा सक्रिय केले जाईल.

मेलानोसाईट्स या पेशी असतात ज्या केसांना रंग देणाऱ्या पिग्मेंट्सची निर्मीती करतात. वाढत्या वयात जास्त ताण घेतल्यामुळे मेलानोसाईट्स हळू हळू निष्क्रीय होत जातात. ज्यामुळे पेशी पिग्मेंट्स बनवणं बंद करतात. ज्यामुळे पांढरे केस ग्रे दिसू लागतात. पण हे केस पारदर्शी असतात.

 या रिसर्चमध्ये थायलंड, ब्राजीलचे  शास्त्रज्ञ सहभागी होते. १० पैकी ६ लोकांच्या केसांचं रंग चार ते पाच ट्रिटमेंटनंतर  ५० टक्के परत आला होता. याशिवाय यात कोणतेही साईट इफेक्ट्स दिसून येत नाहीत.

यापूर्वीही काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे (Side effects) केसांचा मूळ रंग परत आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. २०१७ मधील एका अहवालात असे नमूद करण्यात आले होते की, कॅन्सरवरील काही औषधे, जसे की 'PD-1 inhibitors', काही रुग्णांचे पांढरे केस पुन्हा काळे करत होती. मात्र, या औषधांचे गंभीर दुष्परिणाम देखील होतात.

डॉ. क्रिस्टोस  यांच्या मते, गुलाबापासून तयार केलेल्या एक्सोसोम्सद्वारे (Exosomes) पिगमेंट निर्मिती पुन्हा सक्रिय करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य वाटते, परंतु हा उपचार कायमस्वरूपी आणि पूर्णपणे प्रभावी आहे की नाही यावर अजून संशोधन होणं बाकी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rose stem cells may reverse grey hair, new research suggests.

Web Summary : Research suggests rose stem cells can naturally restore hair color. Stem cells extracted from Damask roses are mixed with chemicals, releasing exosomes that reactivate melanin-producing cells. Initial trials showed color return in some participants, offering a potential alternative to dyes, but further research is needed.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी