दिवाळीचे ३- ४ दिवस म्हणजे नटण्याथटण्याचे दिवस. या दिवसांमध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतींनी तयार होणे, छान कपडे घालून मस्त मेकअप करणे हा बहुसंख्य महिलांचा अतिशय आवडीचा विषय असतो. दिवाळीच्या निमित्ताने तर वेगवेगळे कॉस्मेटिक्सही घेतले जातात. पण काही जणींना खूप काही मेकअप करायला आवडत नाही. पण तरीही त्यांच्याकडे मेकअपमधली अगदी बेसिक असणारी कॉम्पॅक्ट पावडर असतेच. नुसती कॉम्पॅक्ट पावडर जरी लावली तरी तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान बदल दिसू शकतो. पण त्यासाठी कॉम्पॅक्ट लावण्याची योग्य पद्धत मात्र माहिती असायला हवी (correct method of applying compact powder on face). कारण बहुसंख्य जणी चुकीच्या पद्धतीने कॉम्पॅक्ट लावतात आणि त्यामुळे मग त्यांचा चेहरा भुरकट, पांढरट दिसतो. असा चेहरा या दिवाळीत नको असेल तर कॉम्पॅक्ट लावण्याची ही योग्य पद्धत एकदा पाहून घ्या.(how to apply compact powder on face for natural makeup look?)
कॉम्पॅक्ट पावडर लावण्याची योग्य पद्धत
सामान्यपण आपण चेहरा धुतल्यानंतर टोनर, मॉईश्चरायजर लावतो आणि त्यानंतर चेहऱ्यावर फाउंडेशन लावून कॉम्पॅक्ट लावतो. डेली युजसाठी फाउंडेशन न लावता नुसतं कॉम्पॅक्ट लावलं तरी चालतं. पण कॉम्पॅक्ट लावताना आपण त्याच्यातला पफ त्या पावडरवर घासतो आणि तो तसाच आपल्या चेहऱ्यावर लावतो. ही चुकीची पद्धत असून यामुळे पावडर चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर एकतर पॅचेस दिसतात किंवा मग त्वचा भुरकट दिसते. हे टाळण्यासाठी काय करावं याविषयीची खास माहिती ब्युटीशियनने neetu22150 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
कॉम्पॅक्ट लावण्यासाठी ब्यूटी ब्लेंडर घ्या. ते पाण्यामध्ये बुडवून पुर्णपणे ओलसर करून घ्या. त्यानंतर ते पिळून त्याच्यातलं पाणी पुर्णपणे काढून टाका. यानंतर कॉटनचा एक पातळ कपडा घ्या. त्या कपड्यामध्ये ब्यूटी ब्लेंडर गुंडाळा. यानंतर मग त्याच्या मदतीने चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावा. ब्यूटी ब्लेंडरचा हलकासा ओलावा तुमच्या चेहऱ्यावर जाणवायला हवा. अशा पद्धतीने जेव्हा अगदी थोड्याशा पाण्यात कॉम्पॅक्ट मिक्स होतं, तेव्हा ते तुमच्या त्वचेवर छान बसतं आणि तुम्हाला नॅचरल लूक मिळवून देतं. ट्राय करून पाहा.