Join us

रोज सनस्क्रीन लावल्याने कॅन्सर होतो?, जाणून घ्या, कशी घ्यायची त्वचेची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:06 IST

सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट (UV) रेज हे त्वचेच्या कॅन्सरचं मुख्य कारण आहे. 

लोकांमध्ये एक चुकीचा समज आहे की, सनस्क्रीनमुळे कॅन्सर होतो. खरं तर सनस्क्रीन हानिकारक UV रेजला रोखून त्वचेला कॅन्सरपासून वाचवतात, जे कॅन्सरचं मुख्य कारण आहे. अतिशय कडक उन्हात सनस्क्रीन लावणं त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवर लावण्यासाठी ३० किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेली ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन निवडा. ती दररोज लावल्याने त्वचेचं UV रेजपासून संरक्षण करता येतं. 

सनस्क्रीन लावणं का महत्त्वाचं?

UV रेज आणि कॅन्सर

सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट (UV) रेज हे त्वचेच्या कॅन्सरचं मुख्य कारण आहे. ज्यामुळे मेलेनोमा आणि नॉन-मेलेनोमा स्कीन कॅन्सर होतो. अशा परिस्थितीत, सनस्क्रीन एक ढाल म्हणून काम करते. सनस्क्रीन हानिकारक UV रेज तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून आणि नुकसान होण्यापासून रोखते.

कॅन्सरचा धोका कमी

दररोज आणि योग्यरित्या सनस्क्रीन वापरल्याने त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. 

ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन निवडा

UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करणारा सनस्क्रीन निवडा, ज्याला "ब्रॉड स्पेक्ट्रम" असं लेबल दिलं आहे.

तुमच्या त्वचेनुसार SPF निवडा

३० किंवा त्याहून अधिक SPF असलेले सनस्क्रीन निवडा, कारण सामान्यतः त्वचेसाठी योग्य SPF निवडला पाहिजे. चेहरा, मान, कान आणि हातासह त्वचेवर सनस्क्रीन लावा. जर तुम्ही पोहत असाल किंवा घाम येत असेल तर दर दोन तासांनी किंवा त्याहून अधिक वेळा सनस्क्रीन पुन्हा लावा.

फक्त सनस्क्रीनवर अवलंबून राहू नका

सनस्क्रीन वापरण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी इतर गोष्टी देखील वापरल्या पाहिजेत. जसं की जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा सावलीत राहा, स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यानुसार कपडे घाला, बाहेर जाताना सनग्लासेस विसरू नका. कडक उन्हात बाहेर पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकर्करोग