निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आपल्या शरीरात सर्व आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. आपल्या शरीरात जर यापैकी कुठल्याही एखाद्या घटकाची (Signs of low collagen in your skin Simple ways to give it a boost) कमतरता असेल, तर अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे आपले एकूणच आरोग्य बिघडू शकते. या आवश्यक घटकांपैकीच एक म्हणजे कोलोजन. 'कोलोजन' हे एक प्रकारचे प्रोटीन असते. हे आपली त्वचा आणि सौंदर्यासाठी (Collagen Deficiency Signs, Causes and How to Treat It) खूप गरजेचे असे प्रोटीन आहे. आपल्या शरीरातील एकूण प्रोटीनच्या सुमारे ३०% भाग फक्त कोलोजनच असते. कोलोजन त्वचा, हाडे, सांधे, स्नायू आणि केस यांना मजबूत करण्याचे काम करते(Collagen Deficiency Symptoms Early Signs & Natural Tips To Boost Collagen).
साधारणपणे वय वाढल्यावर शरीरात कोलोजनची पातळी कमी होऊ लागते. मात्र सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान, झोपेची कमतरता आणि ताणतणाव अशा सवयींमुळे ही समस्या कमी वयातच दिसू लागली आहे. आपल्या शरीरातील कोलोजनची पातळी खालावली की यांचे संकेत आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर दिसून येतात. ही लक्षणं वेळीच ओळखून आपण नैसर्गिक पद्धतीने कोलोजनची कमतरता भरून काढू शकता.
कोलोजनची कमतरता झाल्यास दिसतात ही लक्षणं...
१. शरीरात कोलोजनची कमतरता झाल्यास आपली त्वचा सैल पडू लागते. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात, तसेच त्वचा कोरडी होते आणि निर्जीव, फिकट दिसू लागते.
२. जर केस सतत गळत असतील किंवा तुटत असतील, तर शरीरात कोलोजनची कमतरता असू शकते. कोलोजनची कमतरता झाल्यास केस पातळ, कमकूवत आणि निर्जीव होतात. यामुळे स्काल्प देखील अगदी स्पष्टपणे दिसू लागते.
३. कोलोजनची कमतरता झाल्यास डोळ्यांच्या किंवा गालांच्या आसपास खोल खड्डे पडू लागतात. यामुळे आपण वयापेक्षा लवकर म्हातारे किंवा खूपच थकलेले दिसू शकता.
नारळाचे दूध म्हणजे त्वचेसाठी अमृत! मॉइश्चरायझर ते टॅनिंग रिमूव्हर - चेहऱ्याला लावा आजपासूनच!
४. जर आपले स्नायू कमकूवत झाले असतील, तर ते देखील कोलोजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. लक्षात ठेवा की कोलोजन हे स्नायूंच्या ऊतींसाठी खूप आवश्यक असते. याची कमतरता झाल्यास शरीरात वेदना होऊ शकतात.
५. कोलोजन कमी झाल्यास सांध्यांमध्ये कडकपणा, वेदना किंवा कार्टिलेज लवकर खराब होण्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसची समस्या होऊ शकते.
६. कोलोजनच्या कमतरतेमुळे नखंही कमजोर होतात. नखं पटकन तुटण्याची समस्या वाढते. जर नखं वारंवार तुटत असतील, तर आपण समजू शकतो की, शरीरात कोलोजनची कमतरता झाली आहे.
७. कोलोजन शरीरावरील जखमा भरून काढण्यास मदत करते. त्यामुळे याची कमतरता झाल्यास जखमा भरायला जास्त वेळ लागू शकतो.
पोटली तेलाने करा मसाज! आजीबाईच्या बटव्यातील सोन्यासारखा उपाय, केसांच्या समस्याच विसरुन जा...
कोलोजनची कमतरता कशी भरुन काढावी?
१. आहारात व्हिटॅमिन 'सी' युक्त पदार्थांचा भरपूर प्रमाणात समावेश करणे गरजेचे असते, कोलेजन निर्मितीसाठी हे आवश्यक आहे.
२. प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, प्रोटीन कोलेजन तयार करण्यास मदत करते.
३. जास्त सूर्यप्रकाश त्वचेतील कोलोजन कमी करू शकतो, यामुळे जास्त वेळ सूर्यप्रकाशात जाणे टाळा.
४. दररोज एक्सरसाइज करा, एक्सरसाइजमुळे कोलोजनची पातळी स्थिर ठेवण्यास मदत मिळते.
५. धूम्रपान शरीरातील कोलोजन नष्ट करण्याचे काम करते, यामुळे धूम्रपान करणे टाळावेच.
६. स्ट्रेसमुळे कोलोजनच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो, यासाठी स्ट्रेस घेऊ नका.