Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पार्लरचं महागडं 'डी - टॅन' कशाला? घरीच कॉफी स्क्रबने असं निघेल त्वचेचं टॅनिंग - रुपयाही खर्च न करता येईल ग्लो...

पार्लरचं महागडं 'डी - टॅन' कशाला? घरीच कॉफी स्क्रबने असं निघेल त्वचेचं टॅनिंग - रुपयाही खर्च न करता येईल ग्लो...

homemade coffee scrub for tan removal : coffee scrub for skin tanning removal : कॉफी पावडरमध्ये फक्त दोन पदार्थ मिक्स करा त्वचेचं सन टॅनिंग ५ मिनिटांत काढण्याची जादू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 17:14 IST2026-04-03T17:10:15+5:302026-04-03T17:14:05+5:30

homemade coffee scrub for tan removal : coffee scrub for skin tanning removal : कॉफी पावडरमध्ये फक्त दोन पदार्थ मिक्स करा त्वचेचं सन टॅनिंग ५ मिनिटांत काढण्याची जादू...

coffee scrub for skin tanning removal homemade coffee scrub for tan removal | पार्लरचं महागडं 'डी - टॅन' कशाला? घरीच कॉफी स्क्रबने असं निघेल त्वचेचं टॅनिंग - रुपयाही खर्च न करता येईल ग्लो...

पार्लरचं महागडं 'डी - टॅन' कशाला? घरीच कॉफी स्क्रबने असं निघेल त्वचेचं टॅनिंग - रुपयाही खर्च न करता येईल ग्लो...

सध्याच्या रणरणत्या उन्हांत घराबाहेर पडायचं म्हणजे अनेकींना फारच टेंन्शन येत. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेवर टॅनिंग होणं ही उन्हाळ्यातील फारच कॉमन समस्या आहे. उन्हाळा सुरू झाला की, कडक ऊन आणि घामामुळे आपली त्वचा निस्तेज दिसू लागते. उन्हामुळे त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि असमान दिसू लागली की आपण आपला आहे तोच स्किन टोन जपण्यासाठी अनेक उपाय करतो. यातही मग कधी त्वचेवर सनस्क्रीन चोपडलं जातं तर कधी पार्लरमध्ये जाऊन महागडी डी-टॅन ट्रीटमेंट केली जाते. परंतु उन्हाळ्याच्या सिझनमध्ये दर दोन दिवसांनी सॅन टॅनिंग काढण्यासाठी असे महागडे आणि केमिकल्सयुक्त उपाय करणं नेहमीच शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, स्किन टॅनिंग काढण्यासाठी कॉफी पावडर वापरून तयार केलेल घरगुती इन्स्टंट स्क्रब हा एक उत्तम पर्याय असू शकतो(homemade coffee scrub for tan removal).

घरात असलेल्या कॉफी पावडरमध्ये फक्त दोन पदार्थ मिक्स (coffee scrub for skin tanning removal) करा आणि पाहा जादू. हे घरगुती स्क्रब तुमच्या त्वचेवरील टॅनिंग खेचून काढेल आणि त्वचा मऊमुलायम करेल. विशेष म्हणजे, याचा परिणाम तुम्हाला पहिल्याच वापरापासून दिसायला लागेल. उन्हाळ्यातील स्किन केअर रूटीनमध्ये या कॉफी स्क्रबचा (natural tanning removal scrub at home) समावेश कसा करायचा आणि ते दोन खास पदार्थ कोणते आहेत ते पाहूयात... 

उन्हाळ्यात स्किन टॅनिंग काढण्यासाठी कॉफी पावडरच घरगुती स्क्रब... 

१. कॉफी पावडर आणि लिंबाचा रस :- लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि सायट्रिक ॲसिड असते. यामुळे तुम्हाला टॅनिंग कमी करण्यास मदत होऊ शकते. लिंबू थोडे आम्लयुक्त (Acidic) असते, त्यामुळे चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी 'पॅच टेस्ट' नक्की करा. सर्वातआधी कॉफी पावडर आणि लिंबाचा रस एका वाटीत एकत्र करा. त्यानंतर तयार मिश्रण ज्या ठिकाणी टॅनिंग झाले आहे तिथे लावा. ५ ते १० मिनिटांपर्यंत वर्तुळाकार गतीने (Circular Motion) हळूहळू मसाज करा. हात हलका ठेवा. त्यानंतर हे मिश्रण १० मिनिटांपर्यंत तसेच लावून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

पार्लरचं महागडं वॅक्सिंग विसरा! गूळ हळदीची इवलीशी पोटली सहज करेल हेअर रिमूव्ह - ना दुखणं, खुपणं सुपरईझी उपाय... 

२. कॉफी आणि साखरेचा स्क्रब :- टॅनिंग दूर करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाप्रमाणेच साखरेचा देखील उपायोग करु शकतो. कॉफी पावडर, साखर आणि नारळाच्या तेलापासूनही स्क्रब तयार करु शकता. हे स्क्रब तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून  कॉफी पावडर, साखर आणि खोबरेल तेल घ्यावं. गरज असल्यास या पेस्टमध्ये तुम्ही थोड पाणी देखील मिसळू शकता. त्यानंतर कॉफी स्क्रबने काही वेळ त्वचेवर मसाज करा. स्क्रब सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

किती दिवस आयब्रो पेन्सिल वापरणार? भरीव, दाट, काळ्याभोर भुवयांसाठी एरंडेल तेल बेस्ट - फरक दिसेल चांगला... 

तासंतास मेहेंदी लावूनही रंग येत नाही? मग मेहेंदी भिजवताना करा १ छोटा बदल - केस होतील रेशमी येईल गडद रंग... 

टॅनिंग काढण्यासाठी कॉफी पावडरचा हा उपाय कसा फायदेशीर ?

१. कॉफी पावडर :- कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून वाचवण्यास मदत करतात. यातील कॅफीन रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा ताजी आणि उजळ दिसते. कॉफी एक उत्तम नॅचरल एक्सफोलिएटर आहे, जी त्वचेवरील डेड स्किन  काढून टाकून नैसर्गिक चमक परत मिळवून देते.

२. लिंबाचा रस :- लिंबू हे नॅचरल ब्लीचिंग एजंट म्हणून ओळखले जाते. यात व्हिटॅमिन 'सी' आणि सायट्रिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, जे त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लिंबामुळे त्वचेचे अधिकचे तेल नियंत्रित राहते आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

३. खोबरेल तेल :- स्क्रबिंग केल्यानंतर त्वचा कोरडी पडू नये, यासाठी खोबरेल तेल अतिशय महत्त्वाचे असते. हे त्वचेला खोलवर हायड्रेट आणि मॉइश्चराइज करते. खोबरेल तेलातील फॅटी ॲसिड्स त्वचेची जळजळ कमी करतात आणि उन्हामुळे रापलेल्या त्वचेला थंडावा देऊन ती मऊ आणि मुलायम बनवते. 

४. साखर :- साखर ही एक उत्तम स्क्रबिंग एजंट आहे. साखरेचे दाणे त्वचेवरील साचलेली धूळ, घाण आणि मृत त्वचा हळुवारपणे काढून टाकतात. साखरेमध्ये 'ग्लायकोलिक ॲसिड' असते, जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास आणि छिद्रे स्वच्छ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा अधिक मऊ वाटते.

Web Title : पार्लर जैसा डी-टैन अब घर पर; कॉफी स्क्रब से पाएं निखरी त्वचा।

Web Summary : घर पर कॉफी स्क्रब से गर्मी में टैनिंग से बचें। कॉफी को नींबू या चीनी और नारियल तेल के साथ मिलाएं। यह प्राकृतिक एक्सफोलिएंट मृत त्वचा को हटाता है, निखार लाता है और नमी प्रदान करता है, जिससे बिना पार्लर जाए त्वचा कोमल और चमकदार बनती है।

Web Title : Ditch salon tan removal; coffee scrub for glowing skin at home.

Web Summary : Avoid harsh summer tanning with a homemade coffee scrub. Mix coffee with lemon or sugar and coconut oil. This natural exfoliant removes dead skin, brightens, and moisturizes, revealing soft, radiant skin without expensive salon treatments.