Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात काळवंडलेली त्वचा होईल पुन्हा तेजस्वी! लावा खास घरगुती कोकोनट फेस पॅक, त्वचा उजळेल- मिळेल पार्लरसारखा ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 15:48 IST

Summer skincare tips for oily and dry skin: Coconut and honey face mask for glow:उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी 'नारळ फेस पॅक' हा एक रामबाण उपाय आहे. हा फेस पॅक लावून ग्लास स्किन कशी मिळावायची हे पाहूया.

कडाक्याच्या उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपली त्वचा फक्त काळी पडत नाही तर तिचा नैसर्गिक ओलावा देखील हरवतो. सनबर्न, टॅनिंग आणि चेहऱ्यावर येणारे काळे डाग यामुळे अनेकदा आपण महागड्या पार्लर ट्रिटमेंचा आधार घेतो.(Skin Care Tips) पण हजारो रुपये खर्च करुनही रासायनिक फेशियलचा ग्लो काही दिवसांतच निघून जातो. जर उन्हाळ्यात आपली त्वचा मऊ आणि उजळ हवी असेल तर स्वयंपाकघरातील नारळ हा सगळ्यात मोठा जादूगार ठरु शकतो. (Summer skincare tips for oily and dry skin)नारळामध्ये फॅटी अॅसिड्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा खजिना असतो. जो त्वचेला आतून पोषण देतो. (Coconut and honey face mask for glow) उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी 'नारळ फेस पॅक' हा एक रामबाण उपाय आहे. हा फेस पॅक लावून ग्लास स्किन कशी मिळावायची हे पाहूया. 

गुडघ्यापर्यंत वाढतील केस! दोन महिने केसांना लावा खास घरगुती आयुर्वेदिक तेल, विरळ केस होतील जाडजूड - लांब

नारळाचा वापर हा फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी देखील पिढ्यानुपिढ्या केला जात आहे. उन्हाळ्यात त्वचा गोरीपान आणि तजेलदार हवी असेल तर फेस पॅक करण्यासाठी लागणारे साहित्य पाहा. 

नारळाचे दूध - २ चमचेमध - १ चमचा बेसन - १ चमचाहळद- चिमूटभर लिंबाचा रस - अर्धा चमचा

फेस पॅक बनवण्याची पद्धत 

एका स्वच्छ बाऊलमध्ये २ चमचे ताज्या नारळाचे दूध घ्या. त्यात १ चमचा बेसन आणि १ चमचा मध मिसळा. आता त्यात चिमूटभर हळद घालून सर्व मिश्रण एकजीव करा. पेस्ट तयार झाल्यानंतर ती खूप जास्त घट्ट असेल तर त्यात नारळाचे तेल घाला. 

पेस्ट त्वचेवर लावण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने किंवा गुलाब पाण्याने स्वच्छ करा. तयार कोकोनट फेस पॅक मान आणि चेहऱ्यावर गोलाकार मसाज करत लावा. हा पॅक २० ते २५ मिनिटे तसाच राहू द्या. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे ओपन पोअर्स बंद होण्यास मदत होईल. 

नारळातील पोषक घटक त्वचेत शोषले जातात, ज्यामुळे चेहऱ्यावर लगेच पार्लरसारखा ग्लो येतो. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा या पॅकच्या नियमित वापराने पुन्हा उजळू लागते. नारळ त्वचेतील लवचिकता टिकवून ठेवतो. ज्यामुळे कमी वयात येणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जातात. उन्हाळ्यात घाम आणि उष्णतेमुळे त्वचा निर्जीव होते, नारळाचे दूध त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते.

नारळात असणारे फॅटी अॅसिड्स त्वचेचा कोरडेपणा दूर करुन आतून मऊ आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात घामामुळे त्वचा निर्जीव होते. अशा वेळी नारळाचा पॅक त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतो. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नारळाचे दूध प्रभावी आहे. यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे त्वचेचा रंग उजळतो आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे झालेले त्वचेचे नुकसान भरुन निघते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brighten sun-tanned skin with a homemade coconut face pack for glow.

Web Summary : Combat summer tan with a coconut face pack. Coconut milk, honey, gram flour, turmeric, and lemon juice blend to hydrate, brighten, and reduce dark spots, offering a natural, parlor-like glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी