वाढत्या वयात आपणही सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत. आधीच पिकलेले केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो.(Skin care tips) अगदी कमी वयातच म्हातारे झालो की, काय असं आपल्याला वाटू लागतं. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण आणि तणावामुळे हे बदल आपल्याला अकाली पाहायला मिळत आहे.(Beauty Tips) या समस्यांपासून सुटण्यासाठी आपण महागड्या केमिकल क्रीम्सचा वापर करतो. पण याचे परिणाम तात्पुरता असला तरी काही वेळा त्वचेला हानी पोहोचते. अशावेळी स्वयंपाकघरात असणारा लवंग फायदेशीर ठरु शकतो. (Best homemade night cream for glowing skin)लवंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करतात.(Cloves for skin tightening and glow) रात्रीच्या वेळी त्वचेला लवंगाची क्रीम लावल्यास ती त्वचेच्या खोलवर जाऊन काम करते.यामुळे फक्त सुरकुत्याच कमी होत नाहीत, तर चेहऱ्यावरील हट्टी काळे डागही हळूहळू फिका पडू लागतात. ही लवंगाची अँटी-एजिंग क्रीम कशी बनावायची पाहूया.
क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
लवंगा- १० ते १२कोरफड - २ चमचेनारळाचे किंवा बदामाचे तेल - १ चमचापाणी - अर्धा कप
कृती
1. सगळ्यात आधी लवंगा अर्धा कप पाण्यात टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. यामुळे लवंगाचा अर्क पाण्यात उतरेल. नंतर हे पाणी गाळून थंड होऊ द्या.
2. एका बाऊलमध्ये २ चमचे ताज्या कोरफडीचा गर घ्या. त्यात तयार केलेले लवंगाचे २ चमचे पाणी आणि तेल मिक्स करा.
3. हे सर्व मिश्रण चमच्याने नीट फेटून घ्या, जोपर्यंत त्याला क्रीमसारखा पांढरा पोत येत नाही. पांढरा क्रिमी टेक्सचर आला तर आपली नाईट क्रीम तयार होईल. ही क्रीम आपण काचेच्या डबीत भरुन फ्रीजमध्ये ७-१० दिवस साठवू शकतो.
4. ही क्रीम नियमितपणे लावल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहते, ज्यामुळे कपाळावरच्या आणि डोळ्यांच्या कडांच्या सुरकुत्या कमी होतात. लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असातात जे पिंपल्सचे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
5. रात्री आपली त्वचा स्वतःची दुरुस्ती (Repairing mode) करत असते. लवंगामधील युजेनॉल (Eugenol) नावाचे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि कोलॅजनची निर्मिती वाढवतात. रात्री ही क्रीम लावून झोपल्यामुळे त्वचेला पोषक घटक शोषण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे सकाळी चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसतो. ही क्रीम लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.
Web Summary : Fight aging with clove night cream! Cloves' antioxidants rejuvenate skin, reduce wrinkles and dark spots. Make it with cloves, aloe vera, and coconut oil for a youthful glow. Regular use improves skin elasticity and reduces blemishes, revealing a fresher, brighter complexion.
Web Summary : लौंग नाइट क्रीम से पाएं बढ़ती उम्र के लक्षणों से छुटकारा! लौंग के एंटीऑक्सीडेंट त्वचा को फिर से जीवंत करते हैं, झुर्रियां और काले धब्बे कम करते हैं। इसे लौंग, एलोवेरा और नारियल तेल से बनाएं और पाएं जवां निखार। नियमित उपयोग से त्वचा की लोच में सुधार होता है और दाग-धब्बे कम होते हैं, जिससे रंगत निखरती है।