Join us
Daily Top 2Weekly Top 5

५० व्या वर्षीही दिसाल तिशीतली तरुणी! चिया सीड्सचा 'नॅचरल बोटॉक्स' देईल चेहऱ्यावर ग्लो- सुरकुत्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2026 12:43 IST

Home remedies for skin tightening: 50 nantar tarun disnyache gharguti upay: चिया सीड्सचा हा घरगुती उपाय आपल्यासाठी जादूई ठरू शकतो. घरच्या घरी 'नॅचरल बोटॉक्स जेल' कसे तयार करायचे.

वाढत्या वयानुसार त्वचेवर सुरकुत्या येणं, त्वचा सैल पडणे किंवा नैसर्गिक चमक कमी होणे या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्याला त्वचेची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे.(Home remedies for skin tightening) वयाची चाळीशी गाठण्यापूर्वीच अनेकांच्या चेहऱ्यावर अँटी-एजिंगची लक्षणे दिसू लागतात. अशावेळी अनेकजण बोटॉक्स सारखे महागडे केमिकल ट्रिटमेंट्स करुनही आपल्याला हवा तसा ग्लो मिळत नाही. (50 nantar tarun disnyache gharguti upay)आपल्या आरोग्यासाठी चिया सीड्स  जितके महत्त्वाचं आहे. केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर त्वचेसाठीही चिया सीड्स वरदान ठरतात. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजांचा मुबलक साठा असतो, जो त्वचेला आतून पोषण देतो.(Chia seeds face mask Marathi) यापासून बनवलेले 'अँटी-एजिंग जेल' आपल्या चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करून त्वचा घट्ट करण्यास मदत करते. जर तुम्हाला ५० व्या वर्षीही तिशीतली  तरुणींसारखा नैसर्गिक ग्लो आणि तरुण त्वचा हवी असेल, तर चिया सीड्सचा हा घरगुती उपाय आपल्यासाठी जादूई ठरू शकतो. घरच्या घरी 'नॅचरल बोटॉक्स जेल' कसे तयार करायचे.(Natural Botox at home with Chia seeds)

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

नॅचरल बोटॉक्स जेलसाठी लागणारं साहित्य 

चिया सीड्स - २ चमचेपाणी -  १ कप कोरफडे जेल - १ चमचा गुलाब जल - १ चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल - १ ते २ बूंद 

कृती 

सगळ्यात आधी चिया सीड्स अर्धा कप पाणी किमान २ ते ३ तास भिजत ठेवा. चिया सीड्स पाणी शोषून घेतील आणि जेलसारखा थर तयार होईल. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. तयार झालेली पेस्ट गाळणीने किंवा मलमलच्या कापडाने गाळून घ्या. ज्यामुळे गुळगुळीत जेल तयार होईल. या जेलमध्ये कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई ऑइल मिक्स करा. 

लावण्याची पद्धत 

1. सगळ्यात आधी आपल्याला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. तयार केलेले चिया     सीड्स जेल चेहऱ्यावर आणि मानेवर खालून वरच्या दिशेने लावा. 

2. नंतर २० ते ३० मिनिटे हे जेल चेहऱ्यावर तसेच राहू द्या. जेल सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा.

3. हे जेल त्वचेला नैसर्गिकरीत्या चांगले असते, ज्यामुळे सैल पडलेली त्वचा घट्ट होण्यास मदत होते. ओमेगा-३ फॅटी ॲसिड बारीक रेषा आणि सुरकुत्या हळूहळू कमी करण्यास मदत करतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Look 30 at 50! Chia seeds for natural Botox and glow.

Web Summary : Fight aging with chia seeds! Rich in nutrients, they tighten skin and reduce wrinkles. Make a natural Botox gel at home for youthful glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी