Lokmat Sakhi >Beauty > फेसवॉश-केमिकल्सची सुट्टी! हळदीचा साबण करा घरीच, टॅनिंग-मुरुमे गायब- त्वचा चमकेल

फेसवॉश-केमिकल्सची सुट्टी! हळदीचा साबण करा घरीच, टॅनिंग-मुरुमे गायब- त्वचा चमकेल

chemical free herbal soap: turmeric soap for skin: homemade herbal soap: natural soap for acne: महागड्या फेशवॉशपेक्षा आपण घरीच प्युअर हळदीचा साबण तयार करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2025 14:03 IST2025-06-01T14:02:16+5:302025-06-01T14:03:26+5:30

chemical free herbal soap: turmeric soap for skin: homemade herbal soap: natural soap for acne: महागड्या फेशवॉशपेक्षा आपण घरीच प्युअर हळदीचा साबण तयार करु शकतो.

chemical free herbal soap turmeric Home skin care tips Homemade soap remedies dry and oily acne problem | फेसवॉश-केमिकल्सची सुट्टी! हळदीचा साबण करा घरीच, टॅनिंग-मुरुमे गायब- त्वचा चमकेल

फेसवॉश-केमिकल्सची सुट्टी! हळदीचा साबण करा घरीच, टॅनिंग-मुरुमे गायब- त्वचा चमकेल

ऋतू कोणताही असला तरी आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते.(Skin care tips) बदलत्या ऋतुनुसार आपल्याला सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती आपल्या त्वचेची. आपल्या प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. त्यासाठी आपण अनेक महागडी उत्पादने त्वचेवर लावतो. (chemical free herbal soap)
महागडे पार्लर आणि क्रीमचा वापर आपण सतत चेहऱ्यावर करतो.(turmeric soap for skin) त्यामुळे अगदी कमी वयातच सुरकुत्या, टॅनिंग, मुरुमांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(homemade herbal soap) केमिकल उत्पादनांचा चेहऱ्यावर जास्त वापर झाला की, त्वचा निस्तेज होते. तसेच खाजही सुटू लागते.(natural soap for acne) महागड्या फेशवॉशपेक्षा आपण घरीच प्युअर हळदीचा साबण तयार करु शकतो. ज्यामुळे टॅनिंग- मुरुमे गायब होतील आणि त्वचा चमकण्यास मदत होईल. (herbal soap for oily skin)

हनुवटी-ओठांच्या वर केस येतात? चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी सोपा उपाय- रोज प्या खास ड्रिंक

हळदीचा साबण बनवण्यासाठी सगळ्यात आधी ओल्या हळदीचे साल काढून घ्या. त्यानंतर त्याला कुटून घ्या. सुती कापडात तयार हळदीची पेस्ट घालून त्याचे रस काढा. आइस ट्रेमध्ये तयार पाणी घालून बर्फ साठण्यास ठेवा. नारळाच्या तेलात किंवा ग्लिसरीन बेस सोपमध्ये तयार बर्फ घाला. मिक्स केल्यानंतर चांगले फेटा. जाडसर पेस्ट तयार होईल. साबणाच्या मोल्डमध्ये घालून सेट होण्यास ठेवा. तयार होईल एकदम नॅचरल पद्धतीचा हळदीचा साबण. 


हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे आपल्या त्वचेचे रक्षण करतात. त्वचेवरील मुरुमे बरे करण्याचे काम करतात. यात अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जे ओपन पोअर्सला बंद करण्याचे काम करते. त्वचा उजळवण्यासह डोळ्यांखाली असणारे काळे वर्तुळ दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हळद आपला रक्तप्रवाह उत्तेजित करते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते. त्यात नैसर्गिक चमक निर्माण करणारा गुणधर्म आहे. यात असणारे नारळाचे तेल आपली त्वचा मॉइश्चरायझ करेल. 

 

Web Title: chemical free herbal soap turmeric Home skin care tips Homemade soap remedies dry and oily acne problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.