वाढत्या उन्हामुळे आपल्याला त्वचेची व्यवस्थितरित्या काळजी घेता येत नाही. प्रदूषण, धूळ आणि उन्हामुळे आपली त्वचा काळी पडू लागते. बाजारात मिळणारे महागडे फेसवॉश सुरुवातीला चांगले वाटले तरी त्यातील केमिकल्समुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते.(Natural skin care tips Marathi) अनेकदा पिंपल्स, ऑयली स्किन आणि काळवंडलेला चेहरा या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयोग करतो. पण त्यात फारसा फरक पाहायला मिळत नाही. (Gharat facewash kasa banvaycha)आपल्या स्वयंपाकघरात असे काही पदार्थ असतात जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. पूर्वीच्या काळापासून या गोष्टींचा वापर आपल्या त्वचेसाठी केला जात आहे.(Homemade ubtan powder for face) फक्त ४ साहित्य आणि ५ मिनिटांत आपण नॅचरल फेसवॉश पावडर तयार करु शकतो. ज्या आपल्या त्वचेला खोलवर स्वच्छ करेलच, पण त्यासोबतच पिंपल्स आणि अतिरिक्त तेलापासून सुटका देईल. पाहूया घरच्या घरी नैसर्गिक क्लिन्झर कसं बनवायचं.
त्वचेची काळजी घेण्यासाठी सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे क्लिन्झिंग. आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ झाला नाही तर छिद्रांमध्ये घाण साचून पिंपल्स येतात. यासाठी आपण जे पावडर बनवणार आहोत त्यात हिरवे मूग , चणा डाळ, तांदूळ आणि मसूर डाळ यांसारख्या पौष्टिक घटकांचा वापर केला आहे.
मूग डाळ त्वचेला थंडावा देते आणि छिद्रांमधील घाण बाहेर काढण्यास मदत करते. चणा डाळ हे उत्तम नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. जे मृत त्वचा काढून टाकते. तांदूळ त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि अतिरिक्त तेल शोषून घेते तर मसूर डाळ त्वचेवरील डाग कमी करुन त्वचेला नैसर्गिक चकाकी देते.
ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ मोठे चमचे मूग डाळ, चणा डाळ, तांदूळ आणि मसूर डाळ घ्यावी लागेल. डाळ आधी ओल्या कापडाने पुसून घ्या किंवा धुवून वाळवून घ्या. नंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करा. ही पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. ही पावडर तुम्ही साधारण ३ ते ४ महिने आरामात वापरू शकता.
रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा पावडर हातावर किंवा वाटीत घ्या. त्यात थोडे पाणी किंवा गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. चेहरा ओला करून त्यावर ही पेस्ट लावा आणि साधारण ३०-४० सेकंद हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका.
Web Summary : Beat summer skin woes with a homemade facewash. This natural cleanser uses moong dal, chana dal, rice, and masoor dal to cleanse, fight pimples, and remove excess oil. Prepare the powder, mix with water or rosewater, massage, and rinse for radiant skin.
Web Summary : गर्मी में त्वचा की समस्याओं को हराएं घर के बने फेसवाश से। यह प्राकृतिक क्लींजर मूंग दाल, चना दाल, चावल और मसूर दाल का उपयोग करके साफ करता है, पिंपल्स से लड़ता है और अतिरिक्त तेल हटाता है। पाउडर बनाएं, पानी या गुलाब जल मिलाएं, मालिश करें और चमकदार त्वचा के लिए धो लें।