सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रदूषण, वाढता ताण आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. चेहऱ्यावर अकाली येणारे काळे डाग, पिग्मेंटेशन आणि डलनेस घालवण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या नाईट क्रीम्सवर हजारो रुपये खर्च करतो.(Skin care tips) अनेकदा या क्रीम्समध्ये केमिकल्स असतात, जे तात्पुरता फायदा देतात पण दीर्घकाळात त्वचेचे नुकसान करू शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या कोणत्याही ब्रँडेड कॉस्मेटिक्सपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतात.(Benefits of olive oil for face at night)त्वचेच्या तक्रारींवर 'तेल' लावणं ही जुनी भारतीय परंपरा आहे. रात्री झोपताना लावलेले तेल त्वचेमध्ये खोलवर शोषले जाते आणि पेशींच्या दुरुस्तीचे काम करते. विशेषतः पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी आणि त्वचेचा नैसर्गिक पोत सुधारण्यासाठी तेल उत्तम कार्य करते. सध्या सोशल मीडियावर आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये 'मोहरीचे तेल' आणि 'ऑलिव्ह ऑइल' या दोन तेलांची मोठी चर्चा आहे.(Mustard oil for skin pigmentation) काही लोक मोहरीच्या तेलाला पारंपारिक आणि गुणकारी मानतात, तर काही ऑलिव्ह ऑइलला 'स्किन सुपरफूड' म्हणतात. पण आपल्या त्वचेसाठी नक्की कोणतं तेल 'मॅजिक' करेल? हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्वचेला कोणतं तेल लावायला हवं, जाणून घेऊया.
होळी स्पेशल: पुरणपोळीची रंगत वाढवणारी झणझणीत 'कटाची आमटी', २ टिप्स - तर्री होईल लालेलाल-चविष्ट
ऑलिव्ह ऑइल हे त्वचेसाठी खूप सौम्य आहे. यात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सि़ड़ंट्स भरपूर असतात. जे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्याचे काम करतात. यामुळे सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होते. ड्राय आणि सामान्य त्वचा असणाऱ्यांसाठी हे सगळ्यात चांगले आहे. आपली त्वचा तेलकट किंवा मुरुमे असतील तर चेहऱ्याला लावू नका.
मागच्या अनेक दशकांपासून मोहरीच्या तेलाचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. मालिशसाठी याचा वापर केला जातो. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेच्या संसर्गावर आणि टँनिंगवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहेत. याने शरीराची मालिश केल्यास रक्ताभिसरण वाढवते. टाचा भेगा पडल्या असतील, हात कोरडे झाले असतील तर हे तेल लावू शकतो. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे काळे डाग फिकट होण्यास मदत होते. हे तेल त्वचेचा काळपटपणा (Tanning) काढण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
जर आपल्याला पिग्मेंटेशन आणि काळे डाग घालवायचे असतील तर मोहरीच्या तेलात बेसन किंवा दही मिसळून लावा. पण,जर चेहऱ्यावर ग्लो आणि सॉफ्टनेस हवा असेल, तर ऑलिव्ह ऑइल फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलचे २ थेंब चेहऱ्यावर लावणे अधिक सुरक्षित मानले जाते. कोणतेही तेल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करु शकता.
Web Summary : Combat dark spots and pigmentation naturally! Olive or mustard oil overnight can rejuvenate skin. Olive oil moisturizes; mustard oil targets tan and pigmentation. Patch test before use.
Web Summary : काले धब्बे और पिगमेंटेशन से स्वाभाविक रूप से लड़ें! रात भर जैतून या सरसों का तेल त्वचा को फिर से जीवंत कर सकता है। जैतून का तेल मॉइस्चराइज़ करता है; सरसों का तेल टैन और पिगमेंटेशन को लक्षित करता है। उपयोग से पहले पैच टेस्ट करें।