Lokmat Sakhi >Beauty > पावसात भिजून केस ओले राहिल्याने उवा होतात का? आणि उवा झाल्याच तर करायचं काय?

पावसात भिजून केस ओले राहिल्याने उवा होतात का? आणि उवा झाल्याच तर करायचं काय?

Causes For Head Lice: पावसात भिजल्यानंतर केस बराच वेळ ओले राहिले तर त्यामुळे डोक्यात उवा होत असतात का, बघा काय खरं..(how to get rid of hair lice or head lice?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:06 IST2025-07-19T14:27:10+5:302025-07-19T16:06:15+5:30

Causes For Head Lice: पावसात भिजल्यानंतर केस बराच वेळ ओले राहिले तर त्यामुळे डोक्यात उवा होत असतात का, बघा काय खरं..(how to get rid of hair lice or head lice?)

causes for head lice, does rain water really responsible for hair lice, how to get rid of hair lice or head lice  | पावसात भिजून केस ओले राहिल्याने उवा होतात का? आणि उवा झाल्याच तर करायचं काय?

पावसात भिजून केस ओले राहिल्याने उवा होतात का? आणि उवा झाल्याच तर करायचं काय?

Highlightsपावसात भिजण्याचा आणि डोक्यात उवा होण्याचा काय संबंध हे तेव्हाही कळायचं नाही आणि आताही ते कितपत खरं आहे हे माहिती नाही, अशी अनेकींची अवस्था आहे.

लहानपणी शाळेतून घरी येताना किंवा घराबाहेर असताना अचानक पाऊस आला आणि आपण भिजलो की धावतपळत घरी जायचो. तेवढ्याच लगबगीने आजी किंवा आई आपल्याकडे यायची आणि 'अगं किती भिजलीस सोड ते केस आणि आधी पुसून कोरडे करून घे, नाहीतर डोक्यात उवा होतील म्हणायची..' टॉवेल घेऊन आपल्यासाठी तयार असायची.. लहानपणी थोड्या फार फरकाने प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असणारच (causes for head lice). पावसात भिजण्याचा आणि डोक्यात उवा होण्याचा काय संबंध हे तेव्हाही कळायचं नाही आणि आताही ते कितपत खरं आहे हे माहिती नाही, अशी अनेकींची अवस्था आहे. म्हणूनच आता बघा यातलं नेमकं काय खरं आणि काय....(how to get rid of hair lice or head lice?)

 

पावसात भिजून केस ओले राहिल्याने खरंच डोक्यात उवा होतात का?

खरं पाहिलं तर पावसात भिजण्याचा आणि डोक्यात उवा होण्याचा काहीही संबंध नसतो. कारण आपल्या डोक्यात उवा तेव्हाच होतात जेव्हा आपण डोक्यात उवा असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येतो. त्या व्यक्तीच्या जवळ डोक्याला डोकं लावून बसतो.

दाढ ठणकू लागली? लगेच औषधं- गोळ्या नको, 'हा' उपाय करून पाहा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल

किंवा मग त्या व्यक्तीचा कंगवा शेअर करतो.. डोक्यात उवा असणाऱ्या व्यक्तीने ज्या टॉवेलने केस पुसले असतील तोच टॉवेल जर आपणही वापरला तरीही आपल्या डोक्यात उवा होण्याची शक्यता खूप जास्त असते. पण अशा कोणत्याच प्रकारे डोक्यात उवा असणारी व्यक्ती आपल्या संपर्कात आलेली नसेल तर पावसाचे पाणी, ओले केस आणि उवा यांचा काहीही संबंध नाही. 

 

डोक्यात उवा झाल्या तर काय करावं?

१. डोक्यात उवा झाल्याच असतील तर बाजारात मिळणाऱ्या फणीने केस विंचरून उवा काढून घ्याव्या..

भुमी पेडणेकर ते विद्या बालन.. कोणी १५ तर कोणी २५ किलोने वजन घटवलं! कसं जमलं त्यांना?

२. कापूर मिसळलेल्या तेलाने डोक्याला मालिश केल्यास उवांचे प्रमाण कमी होऊ शकते.

३. वरील दोन्ही उपाय करूनही फरक पडत नसेल तर बाजारात विकत मिळणारे औषध केसांना लावावे. 

 

Web Title: causes for head lice, does rain water really responsible for hair lice, how to get rid of hair lice or head lice 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.