Lokmat Sakhi >Beauty > पार्लरच्या वाऱ्या करुन चेहऱ्यावर ग्लो येईलच असं नाही, ब्रायडल ग्लोसाठी वापरा ‘हा’ फेसमास्क...

पार्लरच्या वाऱ्या करुन चेहऱ्यावर ग्लो येईलच असं नाही, ब्रायडल ग्लोसाठी वापरा ‘हा’ फेसमास्क...

Bridal Glow Home Remedy : Home Remedy For Glowing Skin For That Bridal Glow : Bridal skin care routine at home naturally : लग्नात सुंदर दिसायचं हवाय ब्रायडल ग्लो मग वापरुन पाहा हा नॅचरल फेसमास्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 18:27 IST2025-01-04T18:14:49+5:302025-01-04T18:27:41+5:30

Bridal Glow Home Remedy : Home Remedy For Glowing Skin For That Bridal Glow : Bridal skin care routine at home naturally : लग्नात सुंदर दिसायचं हवाय ब्रायडल ग्लो मग वापरुन पाहा हा नॅचरल फेसमास्क...

Bridal Glow Home Remedy Home Remedy For Glowing Skin For That Bridal Glow Bridal skin care routine at home naturally | पार्लरच्या वाऱ्या करुन चेहऱ्यावर ग्लो येईलच असं नाही, ब्रायडल ग्लोसाठी वापरा ‘हा’ फेसमास्क...

पार्लरच्या वाऱ्या करुन चेहऱ्यावर ग्लो येईलच असं नाही, ब्रायडल ग्लोसाठी वापरा ‘हा’ फेसमास्क...

'लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा महत्वाचा क्षण असतो. आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. आपले लग्न ठरले असेल आणि येणाऱ्या काहीच दिवसांत 'ब्राईड टू बी' होणार असाल तर आपल्या पार्लरच्या फेऱ्या वाढतात. लग्नासारख्या खास प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांसाठी अनेक ट्रिटमेंट्स करून घेतो. यातही स्किनकडे विशेष लक्ष दिले जाते. लग्नात आपली स्किन सुंदर दिसावी, स्किन ग्लो अधिक उठून दिसावा म्हणून पार्लरमध्ये स्किनवर अनेक उपाय केले जातात. असे असले तरीही स्किनवर मनासारखा ग्लो येण्यासाठी नेहमी पार्लरलाच जावं असं काही नाही(Bridal Glow Home Remedy).

घरच्याघरी काही वस्तूंचा वापर करून तुम्ही (Bridal skin care routine at home naturally) पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. अनेकदा बाहेरच्या क्रिम्समध्ये केमिकल्सयुक्त घटकांचा वापर केला जातो ज्याचा चेहऱ्यावर तात्पुरता परिणाम दिसतो. लग्नासारख्या खास प्रसंगी स्किनवर असा तात्पुरता ग्लो आणण्यापेक्षा काही घरगुती उपाय करुन नॅचरल स्किन ग्लो आणणे केव्हाही चांगलेच. घरात उपलब्ध असणाऱ्या काही नॅचरल पदार्थांचा वापर करून लग्नासाठी स्किनवर सिलेब्रिटींसारखा ग्लो येण्यासाठी वापरुन पहा हा खास फेसमास्क. ब्रायडल ग्लो येण्यासाठी फेसमास्क तयार करण्याची सोपी कृती पाहूयात(Home Remedy For Glowing Skin For That Bridal Glow).     

साहित्य :-

१. मुलतानी माती - २ टेबलस्पून 
२. बेसन - २ टेबलस्पून 
३. आंबेहळद / हळद - २ टेबलस्पून 
४. गुलाबपाणी - गरजेनुसार 
५. गुलाबाच्या पाकळ्या - ६ ते ७
६. पाणी - गरजेनुसार

कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....


हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्या, कोरडी त्वचा? बस्स वाटीभर दही काफी है! पाहा खास उपाय...

कृती :- 

१. सर्वात आधी एका बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून मुलतानी माती, बेसन, आंबेहळद किंवा हळद घेऊन. सगळ्या पावडर चमच्याने हलवून एकत्रित करून घ्याव्यात. 
२. त्यानंतर यात गुलाबाच्या पाकळ्या थोड्या क्रश करून घालाव्यात.  
३. सगळ्यात शेवटी यात गुलाबपाणी किंवा पाणी घालून २ तासांसाठी हे सगळे जिन्नस एकत्रित झाकून ठेवावे. 
४. २ तासानंतर मिक्सरच्या मदतीने हे सगळे मिश्रण बारीक करून त्याची मध्यम कंन्सिस्टंन्सीची पेस्ट तयार करून घ्यावी. 
५. ही तयार पेस्ट एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवावी. 

उडप्याकडे मिळते तशी परफेक्ट 'नीर चटणी' करा घरच्याघरीच, डोसे - वडे खा मनसोक्त...

या फेसमास्कचा वापर कसा करावा ? 

जर तुमचं लग्न ठरलं असेल तर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किमान महिनाभर आधी तुम्ही हा होममेड फेसमास्क लावू शकता. चेहऱ्यावरचे काळे डाग, पिग्मेंटेशन निघून जाण्यासाठी हा मास्क उपयोगी ठरतो. आपल्याला हा मास्क स्किनवर रोज किंवा आठवड्यातून किमान ४ वेळा तरी लावायचा आहे. हा फेसमास्क स्किनवर लावल्यानंतर २० ते २५ मिनिटे तसाच ठेवायचा आहे, त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपण हा मास्क लावू शकता.   

हा मास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे... 

१. मुलतानी माती :- मुलतानी माती त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. जर चमकदार त्वचा हवी असेल तर तुमच्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरू शकते. 
२. बेसन :- बेसन पीठ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. 
३. हळद :- हळदीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेतील घाण, अतिरिक्त तेल, बॅक्टेरिया स्वच्छ करण्यास मदत करते. 
४. गुलाबपाणी :- त्वचा उजळ आणि चमकदार होण्यास  गुलाबपाणी फायदेशीर असते. 
५. गुलाबाच्या पाकळ्या :- स्किनवरील काळे डाग नाहीसे करून चमकदार, मऊ स्किनसाठी गुलाबाच्या पाकळ्या उपयोगी ठरतात.

 

Web Title: Bridal Glow Home Remedy Home Remedy For Glowing Skin For That Bridal Glow Bridal skin care routine at home naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.