केस गळण्याची समस्या आजकाल अनेकांना उद्भवते म्हणून लोक केसांना वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं वापरतात. (Hair Care Tips) पण जर आतून केसांना पोषण मिळत नसेल तर वरून कितीही काहीही लावा चांगला परीणाम दिसूनच येणार नाही तर तुमचे केस गळत असतील तर यामागे पोषक तत्वांची कमतरता हे कारण असू शकतं. घरगुती लाडूंचा आहारात समावेश करून तुम्ही केस गळण्याची समस्या टाळू शकता. हे लाडू पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात हे लाडू करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Hair Fall Control Laddu Recipe)
केस गळती थांबवण्यासाठी लाडू कसे करावेत? (Biotin Laddu Recipe)
केस गळणं रोखण्यासाठी जे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला अर्धा कप काळे तीळ, अर्धा कप भोपळ्याच्या बीया, अर्धा कप अक्रोड, एक चमचा मोरींगा पावडर, एक चमचा आवळा पावडर आणि १ कप बीया काढलेले खजूर आणि तूप या वस्तूंची आवश्यकता असेल. प्रोटीन, व्हिटामीन आणि मिनरल्सनी परीपूर्ण हे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी तीळ, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया मंद आचेवर भाजून घ्या.
हे पदार्थ ४ ते ५ मिनिटं भाजून मग थंड करा. नंतर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. नंतर मोरींगा पावडर आणि आवळा पावडर एकत्र मिसळा. यात तुम्ही खजूरही घालू शकता. सर्व पदार्थ एकजीव करून वाटून घ्या. यात सर्व पदार्थ एकत्र मिसळल्यानंतर तूप घाला नंतर हे मिश्रण हातात घेऊन त्याचे लाडू बनवून घ्या. हे लाडू पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात. ज्याच्या सेवनानं केसांचं गळणं कमी होतं.
या लाडूंनी कोणते फायदे मिळतात?
पोषक तत्वांनी परीपूर्ण असे हे लाडू खाल्ल्यानं शरीराला बायोटीन, जिंक, ओमेगा थ्री, फॅटी एसिड्स आणि आयर्न मिळते. हे लाडू केसांना आतून मजबूत बनवतात.ज्यामुळे केसांना मॉईश्चर मिळते आणि केस सुंदर दिसतात. हे लाडू रोज १ किंवा २ या प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. केसांना आतून पोषण मिळते आणि केस गळणं थांबून केस चांगले सुंदर वाढतात.