बॉलिवूडमधील काही अभिनेत्री (Bhumi Pednekar) या फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या निखळ सौंदर्यासाठी देखील अतिशय लोकप्रिय आहेत. स्क्रीनवर कायम सुंदर आणि छान दिसणाऱ्या या अभिनेत्री आपल्या त्वचेची तितकीच जास्त काळजी घेतात. बॉलिवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी मेकअप सोबतच काही घरगुती उपाय देखील (Bhumi Pednekar Revealed The Secret To Her Glowing Skin Uses Age Old Indian Remedy) हमखास करतात. आपली त्वचा कायम सुंदर दिसावी यासाठी या अभिनेत्री न चुकता रोज आपले स्किनकेअर रुटीन फॉलो करतात. या स्किन केअर रुटीनमध्ये (Bhumi Pednekar turns to traditional skincare for her ‘self-care Sunday’) काहीजणी घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणे अधिक पसंत करतात, अशीच साधेसोपे स्किन केअर रुटीन फॉलो करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर( Bhumi Pednekar's Skincare Routine Is All About This Traditional Indian Skincare Secret, Know The Benefits).
प्रत्येक अभिनेत्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये काहीतरी वेगळं आणि खास असतं. भूमी आपल्या त्वचेसाठी केमिकल फ्री आणि पारंपरिक, नैसर्गिक घटकांचा वापर करायला प्राधान्य देते, आणि त्यातीलच एक म्हणजे तिचा खास 'संडे स्पेशल सेल्फ केअर फेसमास्क'. भूमीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या 'संडे स्पेशल सेल्फ केअर फेसमास्क' चे सिक्रेट शेअर केले आहे. सुंदर, नितळ त्वचेसाठी भूमी नेमका कोणता खास घरगुती उपाय करते ते पाहूयात.
भूमी पेडणेकरला (Bhumi Pednekar) आवडतात घरगुती व नैसर्गिक उपाय...
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जी तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि चमकदार त्वचेसाठी ओळखली जाते. कोणतेही महागडे प्रॉडक्ट्स, फेशियल्स किंवा केमिकल ट्रीटमेंट्स न वापरता, भूमीने मुलतानी मातीसारख्या पारंपरिक घटकाचा वापर करून तिची त्वचा निरोगी, ताजी आणि उजळ ठेवली आहे.
अळशीचा साबण करा घरच्याघरी, विकतच्या साबणांपेक्षा सुंदर आणि त्वचा होते मऊमऊ फ्रेश...
भूमीचा 'संडे स्पेशल सेल्फ केअर फेसमास्क'...
सर्वप्रथम, १ चमचा मुलतानी माती एका भांड्यात घ्या. त्यात थोडंसं पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर सर्वत्र समान पद्धतीने लावा. आता हा मास्क १५ ते २० मिनिटं तसाच राहून सुकू द्यावा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आपण यात आपल्या आवडीनुसार, गुलाबपाणी, नारळपाणी ,बदामाचं दूध देखील घालू शकता. हा फेस मास्क आठवड्यातून १ ते २ वेळा वापरल्यास त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचा स्वच्छ आणि उजळ करते.
जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...
मुलतानी माती त्वचेला लावण्याचे फायदे...
१. मुलतानी माती त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेते, ज्यामुळे त्वचा उजळ फ्रेश आणि ताजीतवानी दिसते.
२. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेवरील पिंपल्स आणि जळजळ कमी करण्यात मदत करतात.
३. नियमित वापर केल्यास त्वचेवरील काळे डाग आणि पिग्मेंटेशन हळूहळू कमी होण्यास मदत होते.
४. मुलतानी माती डेड स्किन काढून टाकून त्वचेचा रंग अधिक उजळ करण्यास मदत करते.